
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी-शेळगाव जिल्हा परिषद गटाच्या, निमगाव केतकी येथील सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ शेंडे यांची उप तालुका प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे.निमगाव केतकी- शेळगाव जिल्हा परिषद गटाच्या विभागप्रमुखपदी रणजित बारवकर, निमगाव केतकी पंचायत समितीच्या उपविभागप्रमुखपदी महादेव कचरे, तर निमगाव केतकी शाखाप्रमुखपदी पांडुरंग सलगर यांची निवड आज इंदापूर येथे शिवसेना जिल्हाप्रमुख महेशदादा पासलकर यांच्या हस्ते करण्यात आली.
सदर नियुक्ती सर्व वरिष्ठ पदाधिकारी यांच्या सुचनेनुसार करण्यात आली असल्याची माहिती शिवसेनेचे तालुकाप्रमुख नितीनजी शिंदे यांनी दिली आहे.
१६ जुलै २०२२ पासून नियुक्ती करण्यात येत आहे. हिंदूहृदय सम्राट शिवसेना प्रमुख सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांचे आदेशा प्रमाणे संघटन वाढवावे व समाजभिमुख काम करावे या करीता निवड करण्यात येत आहे. एका निष्ठावान शिवसैनिकांला पक्षाने संधी दिली असून यापुढील काळातही शिवसेना पक्षवाढीसाठी व सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी काम करणार असल्याचे उपतालुकाप्रमुख सोमनाथ शेंडे यांनी सांगितले आहे. शिवसेना पक्ष स्थापनेपासून अनेक कामे केली असून यापुढील काळात पक्षाने जी संधी दिली आहे. त्याचा उपयोग हा समाजातील वंचित घटकांचे प्रश्न सोडविण्यासाठी करणार असल्याचे नव निर्वाचित उपतालुकाप्रमुख सोमनाथ शेंडे यांनी सांगितले आहे.
यावेळी उपजिल्हाप्रमुख संजयभाऊ काळे, तालुकाप्रमुख नितीनजी शिंदे, तालुका संघटक सुदर्शन रणवरे, तालुका समन्वयक अरुण पवार, शहरप्रमुख मेजर महादेव सोमवंशी यांसह शेखर शेंडे रणजित शेंडे ओंकार शेंडे गणेश काळे पराग घाडगे दादाराम बोराटे सोमनाथ शेंडे शुभम चोरमले नवनाथ शेंडे आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.