
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-संभाजी गोसावी .
सातारा तालुक्यांतील जाधववाडी (तासगांव) गावचे शहीद जवान समाधान मानाजी मोहिते वय ३१ यांचे शुक्रवारी १५ जुलै रोजी ते आपल्या चुलत बहिणीचे लग्न पत्रिका देण्यासाठी म्हसवडला गेले असता लग्नपत्रिका वाटून गावाकडे परत येत असताना माण तालुक्यांतील पांढरवाडी गावानजीक त्यांची गाडी घसरली आणि गाडीवरुन ते पडल्यांने ते जखमी झाले आणि त्यांचा जागीच अंत झाला. त्यांचे प्रथम पार्थिव गावात त्यांच्या निवासस्थानी नेण्यांत आल्यानंतर कुटुंबियीन एकच आक्रोश केला. समाधान मोहिते हे सीमा सुरक्षा दलात कार्यरत होते सैन्य दलात भरती होण्यांच्या जिद्दीने त्यांनी तयारी केली होती खूप परिश्रमानंतर २०११ मध्ये ते बीएसएफ मध्ये भरती झाले होते. सध्या ते जम्मू काश्मीर या ठिकाणी सेवा बजावत होते. गेल्या आठवड्या भरांपूर्वी ते आपल्या चुलत बहिणीच्या लग्नानिमिंत्त सुट्टीवर आले होते. शनिवारी दुपारी त्यांचे पार्थिव गावांत आल्यानंतर त्यांच्या कुटुंबांनी केलेला आक्रोंश हृदय पिळवटून टाकणारा होता. सजवलेल्या वाहनांतून त्यांची अंत्ययात्रा काढण्यांत आली. भारत माता की जय, वंदे मातरम या घोषणांनी सर्व परिसर दुमदुमून गेला होता लष्करी जवानांच्या वतीने हवेत बंदुकीच्या फैरी झाडून त्यांना आखेरची मानवंदना देण्यांत आली. यावेळी राजकीय सामाजिक शैक्षणिक धार्मिक अशा विविध क्षेत्रांतील हजारो नागरिक यावेळी उपस्थित होते. तसेच सातारा जिल्हा प्रशासन तसेच प्रशासकीय अधिकारी व सातारा तालुका पोलीस ठाण्यांचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके साहेब यांनी पार्थिवांचे अंत्यदर्शन घेत श्रद्धांजली वाहिली. शहीद जवान समाधान मोहिते यांच्या पश्चांत आई-वडील भाऊ ,पत्नी, दोन मुले असा त्यांचा परिवार होता. त्यांच्या अचानक जाण्यांमुळे सातारा तालुकासह जाधववाडी गावांवर शोककळा पसरली.