
दैनिक चालु वार्ता पिंपरी प्रतिनिधी -परमेश्वर वाव्हळ
पिंपरी: नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती परिवहन कार्यालय वाशी येथे मंथन फाउंडेशनच्या वतीने मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. मंथन फाउंडेशन नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये तीस हजार ट्रक ड्रायव्हर , हेल्पर क्लिनर, लोडर व अनलोडरसाठी एचआयव्ही एड्स जनजागृती व गुप्तरोग तपासणीचे काम मंथन फाउंडेशनच्या माध्यमातून केले जात आहे. यामध्ये
नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती परिवहन कार्यालय वाशी येथे ७० ड्रायव्हर व परिवहन कर्मचारी स्टाफ यांची एचआयव्ही तपासणी, रक्तदाब व वजन तपासणी करण्यात आले. तसेच सर्व ड्राइव्हर याना मोफत सेनिटायझर, साबण, मास्क साहित्य वाटप करण्यात आले.
या प्रसंगी विशेष उपस्थिती हेमांगिनी पाटील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नवी मुंबई व गावंडे सर, नीलिमा पाटील जिल्हा पर्यवेक्षक, जिल्हा एड्स नियत्रंण व प्रतिबंध ठाणे यांची होती.
शिबिरासाठी मंथन फाऊंडेशन अध्यक्षा आशा भट्ट यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच संस्थेच्या प्रकल्प व्यवस्थापक प्रमिला खराडे, कार्यकर्ते मोनिका,प्रिया,सुशील, मनोज, हर्षदा यांचे विशेष सहकार्य लाभले.