
दैनिक चालू वार्ता मोलगी प्रतिनिधी -रविंद्र पाडवी
सातपुडतील दुर्गम भागात आजच्या घडीला प्रत्येक कामा निमित्त मोबाईल फोन वापरु लागले आहे विविध कामासाठी मोबाईल फोन गरजेचे आहे कारण असे की शासकिय योजना, विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाईल वर काही शिक्षक अद्यापन करून देत असते.आज काही भागांत वेगवेगळ्या ठिकाणी जिओ टाॅवर उभे केले आहेत परंतू गेल्या काही वर्षांपासून जियो टावर अ. कुवा तालुकातील गाव बेडाकुड येथे जिओ टाॅवर “शोभेची वस्तू म्हणून उभे केले आहे ” हा टाॅवर कधी चालू करतील गावातील लोक व या परिसरातील लोकांच्या सोयीसाठी आहे का हा प्रश्न पडला आहे कधी तरी या जिओ टाॅवरवर नाराजी व्यक्त होताना दिसत आहे साधा कॉल करण्यासाठी 3 ते 4 किमी अंतरावर जावे लागते नेटवर्क अभावामुळे ऑनलाइन कामे तर दुर पण फक्त साधा कॉल करण्या साठी टावर लवकरात लवकर या प्रश्नाकडे लक्ष द्यावे ही उपेक्षा व्यक्त केली आहे .श्री.धिरसिंग वळवी सामाजिक कार्यकर्ता , श्री.राकेश पाडवी, श्री.दाजला पाडवी पोलिस पाटील, श्री.रामजी पाडवी सर, श्री.धर्मा डाया पाडवी, सायसिंग वसावे, संदीप दादा सामाजिक कार्यकर्ता,श्री. नरपत पाडवी, श्री. सेमत्या पाडवी,मा.श्री.ग्राम पंचायत बेडाकुड सरपंच दिनेश वळवी इत्यादी ग्रामस्थ कडुन मागणी केली आहे.