
दैनिक चालू वार्ता कोल्हापूर प्रतिनिधी -शहाबाज मुजावर
कोल्हापूर जिल्हा लोककलाकार या संघटनेने दहा वर्षे अल्पावधीच्या काळात सर्वसामान्य कलाकारांना शासन दरबारी सदैव प्रयत्न करून , त्यांना पेन्शन मंजूर करून त्यांना आधार देण्याचे सामाजिक काम या संघटनेने केले आहे , असे प्रातिपादन सद्गुरू बाळूमामा मालिकेमध्ये काम केलेले समर्थ पाटील यांनी केले . कोल्हापूर जिल्हा लोककलाकारचा दहावा वर्धापनदिन उंदरवाडी , ता . कागल येथे घेण्यात आला , त्यावेळी ते बोलत होते . अध्यक्षस्थानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विलास पाटील हे होते . समर्थ पाटील पुढे म्हणाले , जिल्हाध्यक्ष विलासराव कलाकार उंदरवाडी , ता . कागल येथे लोककलाकारच्या दहाव्या वर्धापनदिनात समर्थ पाटील यांचा सत्कार करताना विलास पाटील आदी . पाटील यांनी या संघटनेच्या माध्यमातून अनेक लोककलाकारांना पेन्शन मंजूर करून त्यांचे संसार फुलवण्याचे काम केले आहे . यावेळी राज्य संपर्कप्रमुख रामचंद्र चौगले , माहिला जिल्हाध्यक्षा ,अनिता मगदूम , अशोक पोवार , कागल तालुकाध्यक्ष ,मारुती पाटील , महादेव येटाळे , संजय पाटील , संजय पाटील , बापूसो कुदळे , वासंती गुरव , शालन पाटील आदी उपस्थित होते .