
दैनिक चालु वार्ता परभणी प्रतिनिधी -दत्तात्रय वामनराव कराळे
—————————————-
राज्यभरातील शैक्षणिक संस्थांनी महाराष्ट्र राज्य शिक्षण महामंडळाच्या नेतृत्वाखाली एकत्र यावे जेणेकरुन कोणत्याही अडचणींवर मात करणे शक्य होईल असे आवाहन परभणीचे माजी आमदार, जिल्ह्याचे नेते तथा शिक्षण महामंडळाचे राज्य कार्यवाह विजय गव्हाणे यांनी केले.
खासदार सुप्रिया सुळे यांची राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या अध्यक्षपदी नुकताच निवड झाली आहे. त्यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची एक विशेष बैठक घेण्यात आली. यावेळी अनेक विषयांवर उहापोह करण्यात आला. खा. सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालील महामंडळाच्या अधिपत्याखाली राज्यभरातील सर्व शैक्षणिक संस्थांनी एकत्र येवून लढा दिल्यास निश्चितपणे मात करता येईल, शैक्षणिक विकास साधता येईल शिवाय अडगळीतील सर्व समस्याही मार्गी लावणे शक्य होईल ज्यामुळे सर्व शैक्षणिक संस्थांना सर्वोतोपरी कवच मिळू शकेलही असे गव्हाणे यांनी सांगितले. यावेळी खा. सुळे यांच्यासह अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले.