
दैनिक चालु वार्ता कोरपना तालूका ग्रामीण प्रतिनिधी-प्रदिप मडावी
कोरपना
चंद्रपूर जिल्ह्यात आठवडा भरापासून सर्वत्र पावसाने धुमाकूळ घातला आहे. या अतिवृष्टीच्या पावसामुळे कोरपना तालूका येथिल शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झालेले असुन, जगाचा पोशिंदा हतबल झाला आहे, या पोशिंदयाला जगावे कि मरावे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा झाला आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जाहीर करावी अशी मागणी गोंडवाना गणतंत्र पार्टीचे नेते गजानन पाटील जुमनाके यांनी केली.
शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. आणि तो सध्या मोठ्या संकटात सापडला आहे. त्याला संकटातून बाहेर काढण्याचं काम माय बाप सरकारने कराव, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई न मिळाल्यास गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या वतीने आंदोलन करू असा इशाराही शासन आणि प्रशासनाला जुमनाके यांनी दिला.