दैनिक चालू वार्ताा प्रतिनिधी -संभाजी गोसावी
आळेफाटा ता. (जुन्नर) पुणे ग्रामीण पोलीस ठाण्यांच्या हद्दीमधील आळेफाटा पोलीस स्टेशनचा वर्षभरांपूर्वी पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी पदभार स्वीकारला होता. प्रमोद क्षीरसागर हे दबंग आणि शिस्तप्रिय पोलीस अधिकारी अशी त्यांची पोलीस खात्यांमध्ये ओळख आहे. आळेफाटा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जून २०२२ चा सेवाउत्कृंष्ट मालमत्ता हस्तगत केल्याबद्दल आळेफाटा पोलिसांना माननीय पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव जी देशमुख यांच्या हस्ते पोलीस ठाण्यांतील सर्वच सहकाऱ्यांना सेवा उत्कृंष्ट तपास करुन गुन्हेयांतील मालमत्ता हस्तगत केल्याबद्दल या पुरस्कारांचे वितरण पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते नुकतेच पुणे पोलीस मुख्यालय देण्यांत आला. पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली आळेफाटा पोलिसांनी मागच्या महिन्यांमध्ये ४५ मोटरसायकली व सोने लुटणाऱ्या टोळीचा पडदा पडदाफास करुन एकूण. २३ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला होता. त्याचप्रमाणे मे महिन्यांमध्ये बेल्हे गावच्या हद्दीमध्ये वैष्णवी मल्टीस्टेट मधून व इतर ठिकाणाहूंन चोरीस गेलेले ३४० ग्रॅम सोन्याचा तपास करुन आरोपींकडूंन २२ लाख ५८ रुपयांची मालमत्ता पोलीसांनी हस्तगत केला होता. या त्यांच्या उत्कृंष्ट कामगिरीबद्दल माननीय पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते सेवा उत्कृंष्ट पुरस्कार प्रदान करण्यांत आला. तसेच आळेफाटा पोलिसांच्या उल्लेखनींय कामगिरीबद्दल पुणे जिल्हा प्रशासनाकडूंन तसेच जुन्नर तालुक्यांतून कौतुक होत आहे.
