
दैनिक चालु वार्ता अर्धापूर प्रतिनिधी -मन्मथ भुस्से
आज दिनांक १८/०७/२०२२ रोजी सोमवार लोणी खु ता अर्धापूर जिल्हा नांदेड येथील सततच्या नापिकीमुळे कर्जबाजारीपणा मुळे आत्महत्याग्रस्त शेतकरी भगवान विठ्ठल साळवे यांनी दिनांक ०८/०६/२०२२ रोजी राहात्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.त्यांच्या कुटुंबाला आर्थिक हातभार म्हणून तहसील प्रशासन अर्धापूर यांच्या कडुन १०००००(एक लाख रुपये) धनादेश मा सौ. अमिताताई अशोकराव चव्हाण माजी आमदार भोकर विधानसभा यांच्या हस्ते श्रीमती सुशीलाबाई भगवान साळवे यांना दिला.यावेळी अर्धापूर येथील कर्तव्य दक्ष तहसीलदार मा उज्वला पांगरकर मॅडम, अर्धापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री बालाजीराव पाटील गव्हाणे, जिल्हा सरचिटणीस संजयराव लहानकर, संचालक कृषि उत्पन्न बाजार समिती नांदेड चे संजय लोणे, माजी जिल्हा परिषद सदस्य श्री प्रल्हादराव सोळंके,नायब तहसीलदार मा श्री जगताप साहेब, तलाठी सुर्यवंशी साहेब,देळुब बु चे मा सरपंच श्री शंकरराव ढगे, काँग्रेस महिला कार्यकर्त्या प्रजापती लोणे , श्री संभाजी धारबाजी लोणे, मोहम्मद सुलतान, शबाना बेगम, शेख मकसूद, चाभरा येथील श्री सुभाष कोंडीबा लोणे,सह नागरिक उपस्थित होते .