दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी – कवी सरकार इंगळी
वसुंधरेच्या रक्षणाचा घेतला “
पंचवदन संस्थेने वसा ॥
केले रोपण वृक्षराजांचे “
उजळण्या दाही दिशा ॥
🥦🥦🥦🥦🥦🥦
यशस्वी पाऊल पडते पुढे ॥
स्वच्छते कडून ” वृक्ष संवर्धनाकडे ॥
पंचवदन विश्वकर्मा सामाजिक संस्थेचा अविस्मरणीय उपक्रम , अप्रतिम नियोजन कार्यक्रमाची दर्जेदार रुपरेषा ‘ साचेबद्ध मांडणी . उत्कृष्ठ संघटनात्मक मोर्चे बांधणी . पंचवदन सलाम आपल्या निस्वार्थी कार्याला !!
कमी वेळेत कोळे गावच्या ग्रामस्थांनी वृक्ष लागवड व संवर्धन या कार्यक्रमाचे आयोजन ,संयोजन अप्रतिम केले . सर्व पदाधिकारी व ग्रामस्थांचे कौतूक करावे तेवढे थोडेचं !! पंचवदन सर्व टिमचे पदाधिकारी ‘ सर्व समाज बांधव आपण पुढे होवून आपला खारीच्या वाट्याचा सहभाग नोंदवून हा कार्यक्रम यशस्वी रीत्या पार राबवून वृक्षारोपण करून कोळे गावच्या वैभवात भर घालण्याचा व पर्यावरण रक्षणाचा पाया रचला .
पंचवदन विश्वकर्मा संस्थेचे ध्येयवेडे अध्यक्ष – मा . आप्पासो सुतार सर्व शाखांचे अध्यक्ष व पदाधिकारी तसेच संस्थेचे कायदेशीर सल्लागार , तारणहार – मा .ॲड गणेश सर पंचवदन विश्वकर्मा संस्था उंब्रज संलग्न उपशाखा सातारा , कराड ‘ पाटण यांनी वृक्षरोपण मोहीम यशस्वी पार पाडली . अशी माहीती पंचवदन विश्वकर्मा संस्था पाटण तालूका अध्यक्ष – मा . भरत लोहार यांनी दिली .
