
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- गोविंद पवार
लोहा तालुक्यातील जिल्हा परिषद सर्कस असलेल्या सावरगाव नसरत सेवा सहकारी सोसायटीवर मारकेट समितीचे माजी उपसभापती बालाजी पाटील कदम व मा.जि.प.सदस्य विठ्ठलराव शेटकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामविकास शेतकरी पॅनलचे १३ पैकी १३ जागेवर विजयासह सेवा सहकारी सोसायटीवर भाजपचा झेंडा फडकला आहे.
नांदेड जिल्ह्याचे खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे विश्वासू खंदे समर्थक मारकेट कमिटीचे मा. उपसभापती बालाजी पाटील कदम यांचे १९९५ पासून सेवा सहकारी सोसायटीवर निर्विवाद वर्चस्व आहे. मा. उपसभापती बालाजी पाटील कदम व मा. जि.प. सदस्य विठ्ठलराव शेटकर यांच्या नेतृत्वाखाली सेवा सहकारी सोसायटी सावरगाव नसरत येथे ग्रामविकास शेतकरी पॅनलने १३ पैकी १३ जागेवर विजय संपादन केला. मा. उपसभापती बालाजी पाटील कदम यांच्यासह मोतीराम जाधव, माधव देवकते, हावगीराव बेद्रे, रोहिदास भोस्कर, शिवकांता राईकवाडे, ज्ञानोबा वाघमोडे, शिवाजी हाके, नामदेव भावे, देविदास देवकते, बालाजी जामकर, कमलबाई कदम, विमलबाई कदम विजयी झाले आहेत.
सर्व विजयी उमेदवारांचे खा. प्रतापराव पाटील चिखलीकर, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक माजी जि. प. सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर, मा. जि. प. सदस्य प्रणिता ताई देवरे चिखलीकर, भाजप तालुका अध्यक्ष आनंदराव पाटील ढाकणीकर, मा.उपसभापती नरेंद्र गायकवाड, उपनगराध्यक्ष दत्ता वाले, मा. उपसभापती खुशालराव पाटील बुद्रुक, मा. उपसभापती मारोतराव पाटील बोरगावकर, सरपंच राजु भावे, उपसरपंच प्रकाश चव्हाण, मा.सरपंच माधवराव बेद्रे, ग्रामपंचायत सदस्य रमेश पाटील कदम, पाडुरंग देवकते, रामचंद्र बेद्रे, भारत कदम यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.