दैनिक चालु वार्ता अक्कलकुवा प्रतिनिधी -आपसिंग पाडवी
अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागात काल सरी दहेल या भर रस्त्यावर एका अस्वलाचा मुक्त संचार करतांनाचा video समाज माध्यमावर व्हायरल झाला आहे त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.
सरी दहेल रस्त्यावर अस्वलाचे मुक्तसंचार करतांनाचे दर्शन स्थानिक नागरिकांना झाल्याने परिसरातील नागरीकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. मोलगी – साकलीउमर सरी हा रस्त्या देवमोगरा कडे जातो. त्यातच याच ररत्याने सरी गावाच्या पुढे प्रसिध्द दहेल धबधबा आहे या धबधब्याकडे जाणाऱ्या पर्यटकांची देखील मोठी गर्दी असते त्यामुळे या रत्यावरुन वाहतुक करणाऱ्या प्रवाश्यांनी सावधानता बाळगण्याची गरज व्यक्त केल्या जात आहे.सरी ते दहेल दरम्यान काही ठिकाणी दाट जंगल आहे त्यामुळे दिवसा देखील या रस्त्यावरुन जातांना भिती दायक स्थिती असते त्यामुळे या व्हायरल व्हिडिओ बाबत सत्यता पडताळून वनविभागाने याबाबत तात्काळ कारवाई करण्याची गरज स्थानिकांकडुन व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे परिसरात एकाहुन अधिक अस्वल असल्याचा दावा स्थानिकांकडुन केला जात आहे. खरं तर हा परिसर अस्वलांचे जंगल म्हणुन ओळखला जातो.मात्र गेली अनेक वर्ष कुठलंही अस्वल असे रस्त्यावर दृष्टीक्षेपात आले नसल्याचे सांगितले जात आहे.या व्हायरल व्हीडीओमुळे पुन्हा एकदा या परिसरात अस्वलांचा वावर असल्याचे बोलले जात आहे.
