
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी आर्णी-श्री, रमेश राठोड
आर्णी तालुक्यातील सावळी सदोबा सर्कल मधील सतत पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यात यावी याकरिता तहसीलदार साहेब आर्णी यांच्यामार्फत मुख्यमंत्री साहेब यांना निवेदन देण्यात आले, शेतकऱ्यांना पावसामुळे उभे पीक पाण्यात बुडाल्यामुळे सोयाबीन कापूस हे आज रोजी७ते८ दिवसापासून पावसाची
संततधार सुरूच आहे. त्यामुळे नदी-नाल्याच्या काठावरील हजारो हेक्टर जमिनीतील उभी पिके, जमिनीसह वाहून गेली. तर बहुतांश ठिकाणची पिके सडून गेली आहेत.मागील अनेक वषार्पासून बळीराजा आर्थिक नुकसानीत येत असताना यावर्षी त्याहीपेक्षा बिकट स्थिती म्हणजे कोवळ्या पिकांची झाली आहे. परिणामी संततधार पाऊस सुरु असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. या संकटातून
सावरण्यासाठी सावळी सदोबा सर्कल मध्ये सरसकट ओला दुष्काळ जाहीर,
करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करा, सततच्या पावसामुळे शेतधूरे, बंधारे,
जादा पावसाने तूटफुटीत आले
असून, नदीकठा लगतचे शेतजमिनी खरडून गेले आहे. शेतात पाणी साचल्याने तलावाचे स्वरुप आले असून, या पावसामुळे अनेक पुलावरून पाणी जात असल्याने विविध गावाचा संपर्क तुटलेला आहे.
तर अनेक घरामध्ये पाणी शिरल्याने मातीच्या घरासह चांगल्या घरांची देखील पडझड झाली आहे. यामुळे जनजीवन विसकळीत झाले असून,अशी बिकट परिस्थिती बळीराजावर आली असुन शासनाने आता
पंचनामे न करता सरसकट ओला
दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत करावी. पाण्याखाली खरडल्या गेली आहे, नदी नाले काठावरील जमीन पूर्णपणे खरडून गेली असून त्या शेतकऱ्याच्या उपासमारीची वेळ आली , तात्काळ पंचनामा करून आर्थिक मदत जाहीर करा याकरिता निवेदन देण्यात आले आहे, प्रदेश काँग्रेस कमिटी सहचिटणीसव , युवा काँग्रेस कमिटी तर्फे निवेदन देण्यात आले अविनाश भगत केळझरा (व.), संतोष ढोले दहेली, मुनेश्वर आडे कृष्णनगर इंद्रसिंग चव्हाण कृष्णनगर ,अविनाश चव्हाण चिंचवर्डी, राम पवार माळेगाव, रमेश राठोड सुभाष नगर, असे सावळी सदोबा सर्कलचे मथिल अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते