दैनिक चालु वार्ता कोरपना तालूका ग्रामीण प्रतिनिधी-प्रदिप मडावी
समाज माध्यमाच्या वायरल ने लहान मुलाला मिळाले आई वडील
कोरपना तालूका गडचांदूर
गडचांदुर येथील वार्ड़ नं पाच येथिल किरायाने राहात असलेल्या गृहस्था चा बोलता न येणारा मुलगा हरविला होता घरा पासुन दुर असलेल्या गांधी चौकात तो रडत होता येथिल काहि नागरीकानी ही माहिती गडचांदुर पोलिसांना दिली.तत्काळ पोलिस येवुन त्या छोट्या मुलाला पोलिस ठाण्यात घेवुन आपलेच सामाजिक दायित्व निभावले .ही बातमी वा-या सारखी पसरली पोलिसाच्या सामाजिक दायित्वाने व समाज माध्यमाच्या प्रसाराने अखेर त्या मुलाचे आई वडील मिळाले.
प्राप्त माहिती नुसार एक लहान मुलगा साधारण एक ते दिड वर्षाचा मुलगा खेळता खेळता गांधी चौकात आला चालता येत होते परंतु बोलता येत नसल्याने आता आपण कुठे व कसें जावे त्याला सुचेनासे झाल्याने तो रडत होता उपस्थिताने बराच प्रयत्न केला परंतू घर व वडीलाचे नाव न समजल्याने अखेर ही माहिती पोलिसाना कळविली .माहिती मिळताच पोलिसानी येवुन त्या मुलाला पोलीस ठाण्यात घेवुन गेले सामजिक दायित्व निभावले.ही बातमी समाज माध्यमातून मुलाच्या फोटो सह गडचांदुरात पसरली.पोलिसांच्या मदतीने व समाज माध्यमातून ,व शरण सा मिल चे मालक राजू सचदेव सहकार्याने अखेर त्या लहान मुलाचे आई वडील मिळाले. आई वडीलानी पोलिस प्रशासनाचे,समाज माध्यमाचे ज्यानी ज्यानी प्रतेक्ष व अप्रत्यक्ष रित्या मदत करना-या सर्व नागरिकांचे आभार मानले.
