
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी – संभाजी गोसावी
महाराष्ट्रांच्या पोलीस दलामध्ये कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय अशी त्यांची ओळख असणारे सध्या सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असणारे श्रीमती तेजस्वीनी सातपुते मॅडम या २०१२ च्या तुकडीच्या आयपीएस पोलीस अधिकारी आहेत त्यांनी पोलीस दलांत विविध पदावर उल्लेखनीय कामगिरी केली. सर्वच अधिकारी कर्तव्य कठोर आणि माणुसकीने ओतप्रोत भरलेले दिसून येतात त्यातल्या त्या पोलीस विभागांतील तर सर्वच अधिकारी जनतेला खाकीशी एकरुप करण्यांत गुंतलेले दिसून येतात कोणताही दबाव सहन न करता सामान्यांच्या रक्षणासांठी त्यांना न्याय मिळवून देण्यासांठी धडपडणाऱ्या सोलापूर ग्रामीणच्या पोलीस दलांने साहजिकच सामान्यांच्या मनात वेगळी उंची गाठली आहे आपण बोलत आहोत आयपीएस श्रीमती तेजस्वी सातपुते यांच्या विषयी… धाडसी आणि समाजाभिमुख कामामुळे महाराष्ट्र पोलीस दलांतील लेडी सिंघम आणि शिस्तप्रिय पोलीस अधिकारी अशी यांची पोलीस खात्यांमध्ये चांगलीच ओळख आहे. नगर जिल्ह्यांतील सर्व सामान्य कुटुंबातील असून संघर्ष मनात जिद्द ठेवून आयपीएस झाल्यांमुळे आजच्या तरुणाईमध्ये त्यांची वेगळीच दिशा त्यांनी निर्माण केली आहे. आपले कर्तव्य बजावताना अवैध धंदे, व गुन्हेगारी कंट्रोल ठेवण्यांत सातपुते मॅडम नेहमीच यशस्वी ठरल्या. त्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी कर्तव्य आणि कठोरपणे राबवत असतानाच पोलीस दलाला अधिकधिक समाजाभिमुख करण्यांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले यातून समाजांमध्ये पोलीस दलाची प्रतिमा उंचावण्याबरोबरच पोलीस कर्मचाऱ्यांचे नीतीधैर्य उंचवण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने मदत झाल्यांचे दिसून येते. जालना जिल्ह्यांमध्ये परतूर येथून त्यांनी प्रोबेशच्या माध्यमांतून सेवेला सुरुवात केली महाराष्ट्रांच्या अन्य जिल्ह्यांच्या तुलनेमध्ये जालनांच्या ग्रामीण भागामध्ये अजूनही सामाजिक परिस्थिंतीतील आव्हांने कायम आहेत. सातपुते यांनी प्रोबेशनच्या कालावधीमध्ये परतूर भागामध्ये आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले यामध्ये पारधी समाजांच्या पुनर्वसनासांठी त्यांनी पुढाकार घेतला होता. राज्यांच्या गुन्हे अन्वेषण विभागांत (सीआयडी) या पदावर काम करताना त्यांनी विविध उपक्रम राबवले त्यानंतर त्यांची पुणे ग्रामीणच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती झाली या पदावर अतिशय कमी कालावधीमध्ये त्यांनी आपल्या कामाची छाप सोडली त्या काळातील अतिशय आव्हानात्मक परिस्थितीमध्ये त्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती अतिशय कुशलतेने आणि सक्षमपणे हाताळली. त्यावेळी त्यांना चाकण एमआयडीसी कडूंन सन्मानितही येथे करण्यांत आली होते. त्यानंतर त्यांची पुणे शहरांच्या वाहतूक पोलीस उपायुक्त पदी त्यांची नियुक्ती झाली पुण्यांच्या वाहतुकीला यशस्वी शिस्त त्यांनी चांगलीच लावली त्यांच्या काळामधील पुणे शहरांमध्ये हेल्मेट सक्तीचे निर्णय झाला या त्यांच्या निर्णयानंतर पुणे शहरांमध्ये हेल्मेट २० टक्क्यांवरुन ८०/टक्क्यांपर्यंत पोहोचले. हेल्मेटच्या निर्णयामुळे त्यांच्या काळातील शहरातील अपघाती मृत्यूचे प्रमाण जवळपास ४० ते ४५ टक्क्यांनी कमी करण्यांमध्ये त्यांना यश मिळाले शिवाय पुणेकरांनी त्यांच्या निर्णयाला चांगलाच प्रतिसाद दिला. पुणे शहरांच्या वाहतूक उपायुक्त पदाचा कमी कालावधीमध्ये सुध्दा पुणेकरांसाठी त्यांची कामगिरी कर्तव्यदक्षच ठरली. त्यानंतर त्यांची सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या सातारा जिल्ह्यांत पोलीस अधीक्षक पदी त्यांची नियुक्ती झाली तत्कालीन पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी सातारा जिल्ह्यांचा पदभार घेवुन अवघे सहा महिनेच पूर्ण झाली होती. त्यांचे राज्य गृह विभागांने पुणे शहरांच्या उपायुक्त पदी नियुक्ती केली. सातारा जिल्ह्यांमध्ये महिलाराज पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्याकडूंन पदभार घेतला. यावेळी त्यांचे सातारकरांकडूंन व सातारा जिल्हा प्रशासनाकडूंन स्वागत करण्यांत आले. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी जिल्ह्यांचा पदभार हाती घेताच अवैध धंदेवाल्यांचे धाबे चांगलेच दणाणले होते. त्यांच्या कार्यकाळामध्ये जिल्ह्यांमध्ये अनेक मुकांतर्गत कारवाई, तसेच जिल्ह्यांचा वाहतुकीचा प्रशन, तसेच जिल्ह्यांमध्ये कोणतीही घटनेची माहिती मिळताच त्या स्वता आपल्या पोलीस अधिकाऱ्यांसमवेत घटनास्थळी पोहोचत असत. त्यांनी सातारा जिल्ह्यांमध्ये सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी व सर्व जनतेशी त्यांचे एक नातच बनलं होते. त्यांचे कोरोना काळातील सुद्धा कामगिरी सातारकरांसाठी कर्तव्यदक्ष ठरली. त्यांनी सोशल मीडियांच्या माध्यमांतून सर्व जिल्हा वासियांना नेहमीच काळजी घेण्यांचे आवाहान त्या करीत होत्या. प्रत्येक पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्यांच्या नेहमी संपर्कात होत्या. माजी जिल्हाधिकारी श्वेंता सिंगल यांच्यानंतर सध्या सातारकरांच्या सेवेत असलेले जिल्हाधिकारी शेखर सिंह आणि पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते हे नेहमी सातारा जिल्ह्यांतील कोरोना काळामध्ये आढावा बैठक घेत जिल्हा वासियांना वेळोवेळी सूचना करीत होते. त्यानंतर त्यांची सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती झाली. त्यावेळी त्यांना सातारच्या जिल्हा प्रशांसनाकडूंन स्वागत करून त्यांना निरोप देताना सातारकर चांगलेच भावुक झाले. त्यांनी सातारा पोलीस अधीक्षक पदाचा पदभार गडचिरोली वरुन आलेले कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्संल यांच्याकडे पदभार सोपविला. आणि सातपुते सोलापूरकडे मार्गस्थ झाल्या. त्यांनी सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचा अचानक संध्याकाळच्या सुमारांस अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्याकडूंन दिनांक ९ ऑक्टोंबर २०२० मध्ये पदभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली सोलापूर ग्रामीणच्या हद्दीमध्ये अवैध धंदे, वाळू उपसा अशा अनेक धंदेवाल्यांचे धाबे दणाणले. त्यांनी पदभार घेताच सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील जिल्हाअंतर्गत बदलांचे आदेश प्रथम त्यांनी जारी केले. सोलापूर ग्रामीणच्या पोलीस ठाण्यांचे सर्व प्रभारी अधिकाऱ्यांची अदलाबदल केली. तसे त्यांनी सोलापूर जिल्ह्यांमध्ये ऑपरेशन परिवर्तन मोहीमेतर्ग गुन्हेगारांना समाजांच्या मुख्य प्रवाहांत आणण्याबरोबर अवैध धंद्यांचे समूळ ही मोहीम प्रभावीपणे या परिवर्तनांतुन लहान मुलांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही त्या लोकांचे परिवर्तन होऊन त्यांना समाजांमध्ये ताट मानेने वावरु शकतील यासाठी त्यांनी चांगलाच प्रयत्न केला. तसेच सालाबाद प्रमाणे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली चांगलाच पोलीस बंदोबस्त तैनात करण्यांत आला होता. त्यांनी स्वता धर्मपुरीच्या प्रवेशद्वारा जवळ सातारा जिल्हा प्रशासन माऊलींना निरोप देत असतं तर सोलापूर जिल्हा प्रशासनाकडूंन माऊलींच्या पालखीचे स्वागत करण्यांत येते. यावेळी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांना सातारकरांची आठवण येते. यावेळी सातारा जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांची माऊलींच्या पालखी निमिंत्त पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची भेट घडून येते. त्यांच्या या सातारा जिल्ह्यांतील उत्कृंष्ट कामगिरीबद्दल सातपुते मॅडम यांची सातारकरांना चांगलीच आठवण आहे असे म्हणण्यांत काही वावगे ठरणार नाही. त्यांत सातारा जिल्ह्यांचे कर्तव्यदक्ष पत्रकार संभाजी गोसावी यांचा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते मॅडम यांचा चांगलाच परिचय असुन. यांच्यासह विविध जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी व जिल्ह्यांतील पोलीस अधीक्षक व पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी यांच्याशी गोसावी यांचा चांगलाच परिचय दिसून येत आहे.