
दैनिक चालू वार्ता खानापूर सर्कल प्रतिनिधी- मानिक सुर्यवंशी
देगलूर:सन 2021-2022 या वर्षामध्ये संत गाडगेबाबा गाव स्वच्छता अभियान मध्ये खानापूर गटामधून वझरगा हे गाव प्रथम क्रमांक पटकावल्यामुळे आज संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता तपासणी समिती नांदेड कडून गावातील ग्रामपंचायत अंगणवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वैयक्तिक स्वच्छालय घानकचरा व्यवस्थापना व इतर कामाची पाहणी करण्यात आली . यावेळी मिलिंद व्यवहारे-माहिती शिक्षण संवाद तज्ञ, विशाल कदम -स्वच्छता तज्ञ, महेंद्र वाटोरे समाजशास्त्र तज्ञ, सुनील भोपाळकर तालुका स्वच्छता तज्ञ, गणेश कोकणे ग्रामविकास अधिकारी, बस्वराज पाटील मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वझरगा, मिरगाळे मॅडम , कांबळे मॅडम,रुक्माजी औरादे सरपंच प्रतिनिधी, भगवान जालणे माजी सभापती, वसंत सूर्यवंशी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, शिवाजी वझरेकर, अशोक कोकणे, शिवाजी पांचाळ, हनमंतराव कोकणे, दौलत जालणे,रामेश्वर कोकणे,ज्ञानेश्वर कोकणे आदी गावकरी उपस्थित होते . संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता या समितीने स्वच्छतेची पाहाणि करून गावकऱ्यांना स्वच्छते विषयी मार्गदर्शन केले