
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे.
देगलूर:महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या 13 व्या वर्धापण दिनाच्या निमित्ताने बँकेचे सहाय्यक व्यवस्थापक संभाजीराव जबडे यांच्या पुढाकारातून व देगलूर येथील शाखेचे मँनेजर संदिप शिरफुले सर, कँशिअर दासरवाड साहेब व सामाजिक कार्यकर्ते तथा विश्व पब्लिक स्कूलचे संचालक कैलास येसगे कावळगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भक्तापूर रोडवरील Vishwa Public School मध्ये सप्तपर्णी, कडूलिंब, आंबा व इतर रोपांचे वृक्षारोपन करण्यात आले. या रोपट्यांचे व्यवस्थित संगोपन करून ते वाढवू अशा निश्चय याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षिका व विद्यार्थ्यांनी केला. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका आम्रपाली येसगे, स्वाती मनधरने मँडम, बिडवे मँडम, रामशेट्टे मँडम, देशमुख मँडम, स्वामी मँडम व पूजा आचेगावे मँडम यांचे विशेष सहकार्य लाभले. शाळेतील विद्यार्थ्यांनी खूपच उत्साहात वृक्षारोपन केले व महाराष्ट्र ग्रामीण बँकेतील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानले.