
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी – गोविंद पवार
माजी नगरसेवक रमेश माळी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन दिले निवेदन
लोहा येथील शिवसेनेचे माजी नगरसेवक रमेश माळी यांच्या वरील खोटे गुन्हे मागे घेऊन पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांची बदली करण्यात यावी अशी मागणी माजी नगरसेवक रमेश माळी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शिवसेनेचे माजी नगरसेवक रमेश माळी यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्यावर सिडको ग्रामीण नांदेड चे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी केलेल्या अन्यायाचा पाढा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर वाचून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले.
पुढे निवेदनात रमेश माळी यांनी असे नमूद केले की, पोलीस निरीक्षक अशोक यांनी माझ्यावर शिवसेना पक्षाच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांवर काम करीत असताना व आंदोलन करीत असताना जाणिवपूर्वक गुन्हे दाखल केले असुन ते मागे घेण्यात येऊन पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांची बदली करण्यात यावी अशी मागणी केली आहे.