
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी -नवनाथ यादव
भूम :-तालुका माजी सैनिक फेडरेशनच्यावतीने गोलाई चौक येथे कारगिल विजय दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे, यावेळी तालुक्यातील बहुसंख्य नागरिकांनी, युवक, युवतीनी व सर्व माजी सैनिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन तालुका अध्यक्ष हेमंत पुरुषोत्तम देशमुख यांनी केले आहे.
बुधवार दिनांक २० जुलै रोजी भूम तालुका माजी सैनिक फेडरेशनच्यावतीने तालुकास्तरीय बैठक पंचायत समिती सभागृहामध्ये घेण्यात आली, या बैठकीमध्ये माजी सैनिकांना शासनामार्फत मिळत असलेल्या सेवा सुविधा संदर्भात प्रशासनाच्या अनेक अधिकाऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही, या अनुषंगाने फेडरेशनच्या माध्यमातून माजी सैनिकांच्या प्रश्नासंदर्भात दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यानी सहकार्य करावे , यापुढे कामे प्रलंबित राहणार नाहीत, माजी सैनिक फेडरेशन कार्यालयासाठी नगर पालिकेकडून भूम शहरात एक गाळा मिळावा आदी अनेक प्रश्न संदर्भात सकारात्मक चर्चा करण्यात आली.
या बैठकीवेळी मंगळवार दिनांक २६ जुलै रोजी तालुक्याच्यावतीने भूम गोलाई चौक येथे कारगिल विजय दिन साजरा केला जाणार आहे. या कारगिल विजय दिनामध्ये तालुक्यातील सर्व माजी सैनिका बरोबरच ज्येष्ठ नागरिक वर्ग, यूवक . युवतीने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले.
या बैठकीसाठी सैनिक फेडरेशनचे तालुका अध्यक्ष हेमंत पुरुषोत्तम देशमुख यांच्याबरोबरच उपाध्यक्ष लक्ष्मण पोळ , सचिव प्रभाकर हाके, कार्याध्यक्ष पोपटराव जाधव, ग्रामीण कार्याध्यक्ष बाळराजे पाटोळे, संघटक शहाजी पगारे , भगवान धुमाळ, बाबाहरी चंदनशिवे , दत्तात्रय गिलबिले, सुदाम शेलार, किसन चौधरी, हरिश्चंद्र नलवडे , दादाराव पवार , प्रभाकर अवताडे, दादाहरी तेलंगे, शिवाजी चव्हाण, कल्याण मुंडे, परमस भगवान, साहेबराव झोरे, मनोहर कवडे , पांडुरंग खोसे, गुरुदास बोराडे, नारायण जाधव, राजेंद्र फारणे, प्रकाश पाटील, युवराज हाके आदींची उपस्थिती होती.