
दैनिक चालू वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
=====================
अहमदपूर;- महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेचा 13 वा वर्धापन दिनानिमित्त मौ.गंगाहिप्परगा व धसवाडी येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तसेच या वर्धापन दिनानिमित्त गंगाहिप्परगा व धसवाडी येथील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यामध्ये एकुण गंगाहिप्परगा येथील 32 गटाच्या महिला व गटातील सदस्य, सचिव, अध्यक्ष मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या तसेच मौ.धसवाडी येथील 25 गटाच्या महिला देखील उपस्थित होत्या तसेच या वर्धापन दिनाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेचे शाखा व्यवस्थापक योगेश गुप्ता साहेब, यांनी दोन्ही गावांतील महिला बचत गटाच्या महिला योग्य मार्गदर्शन केले
पिक कर्ज, नुतनीकरण, बॅंकेच्या पाॅलीसी, गृहकर्ज,छोट्या मोठ्या उद्योगासाठी कर्ज देण्यात येते व या सर्व योजना बचत गटाच्या महिलांना व गावातील नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले
तसेच या कार्यक्रमाला दोन्ही गावांतील महिला व सदस्य तसेच महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेचे कर्मचारी अविनाश सूर्यवंशी साहेब , सरपंच सुखदेव कदम, ग्रामसेवक मोहन केंद्रे साहेब, सर्व ग्रामपंचायत सदस्य व गावातील नागरिक उपस्थित होते