
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -शाम पुणेकर.
पुणे: डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना करणारे थोर भारतीय नेते म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक! टिळकांच्या राजकीय कारकिर्दीत
सार्वजनिक समाजकार्य, देशहित इ सर्व प्रकरणांत त्यांची भूमिका प्रखर राहिलेली तसेच स्वराज्य हा त्यांचा प्रधान हेतू मानला जात असे! याकरिता ब्रिटिश सरकारच्या राज्यकारभारातील दोष व अन्याय यांवर वृत्तपत्रांतून उघड टीका करण्यास त्यांनी सुरुवात केली. तसेच प्रांतिक परिषदा व काँग्रेसच्या कार्यात भाग घेऊन त्याचे स्वरूप जहाल राष्ट्रवादी बनविले व जनतेच्या मनात ज्वलंत देशाभिमान व स्वातंत्र्यप्रेम चेतवून, स्वातंत्र्यासाठी प्रत्यक्ष संघर्ष करण्यास लोकांची मनोभूमिका तयार करण्याचा त्यांनी प्रयत्न केला!
भारतीय नेते आणि भगवद्गीतेचे आधुनिक भाष्यकार महान नेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जयंती निमित्त अनेक संस्था, संघटने तर्फे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले तसेच केसरी वाडा आणि मंडईतील टिळक पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून नम्र अभिवादन करण्यात आले.