
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- गोविंद पवार
हर घर तिरंगा या अभियाना अंतर्गत लोहा शहरातील सर्व नागरिकांनी सहभागी होऊन आपल्या घरावर आपल्या भारत देशाचा राष्ट्रध्वज असलेला तिरंगा ध्वज फडकावा असे आवाहन लोहा नगर परिषदेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी गंगाधर पेंटे यांनी केले आहे.
आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण झाली असल्यामुळे गत वर्षभरापासून शासनाच्या वतीने विविध उपक्रम व योजना राबविण्यात येत आहेत.
भारत के आझादी का अमृत महोत्सव उपक्रमा अंतर्गत दि. १३ आगस्ट ते १५ आगस्ट दरम्यान लोहा शहरात मा. जिल्ह्यधिकारी नांदेड डॉ.विपीन इटनकर यांच्या आदेशानुसार व लोहा न.पा.चे नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली लोहा शहरात हर घर तिरंगा अभियान राबविण्यात येणार असून या अभियानात लोहा शहरातील सर्व नागरिकांनी सहभागी होऊन आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकावा व राष्ट्रीय भावना , राष्ट्रप्रेम जोपासावे असे आवाहन मुख्याधिकारी गंगाधर पेंटे केले आहे व यासाठी लोहा न.प. अंतर्गत जनजागृती करण्यासाठी लोहा शहरातील बचत गटांच्या महिला , लोहा न.पा.चे कर्मचारी शहरात प्रभात फेरी काढणार आहेत अशी माहिती लोहा न.पा.चे मुख्याधिकारी गंगाधर पेंटे यांनी दिली.