
दैनिक चालू वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
=====================
अहमदपूर :- तालुक्यातील रुद्धा येथील सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅश्नल स्कूल, रुद्धा ता. अहमदपूर येथे आज लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी करण्यात आली. याजयंती उत्सवाच्या सुरुवातीस लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन संचालक कुलदीप हाके व संचालिका सौ. शिवालिका हाके यांच्या हस्ते करण्यात आले .
याजयंती उत्सवात शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून अत्यंत उत्कृष्टभाषणे केली. या उत्सवाचे सूत्रसंचलन प्राचार्य रुत चक्रनारायणन यांनी केले. तर जयंतीच्या यशस्वितेसाठी शाळेतील उपप्राचार्य प्रा. राम भोंग , प्रा. संभाजी सांगळे , प्रा.भरत कानवटे , प्रा. शुभम पोले , प्रा. ऋत्विक पोले , प्रा. शेख ,शुभांगी कानवटे, ज्योत्सना स्वामी, स्नेहा ओझा, अंजली बोधनकर अपर्णा शेंडगे, केशव तोंडारे, चंदा काडवादे, सुभद्रा महाजन, भागवत बेद्रे, अंगद सुरनर यांनी सहकार्य केले. तर जयंती उत्सवाचे आभार उपप्राचार्य प्रा. राम भोंग यांनी केले