दैनिक चालु वार्ता पिंपरी प्रतिनिधी-परमेश्वर वाव्हळ
पिंपरी: महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अनाथ आश्रम सावली निवारा केंद्राला कोविड योद्धा युनूस पठाण (राष्ट्रवादी सफाई कामगार सेल महाराष्ट्र राज्य सचिव) यांनी इतर होनारा वायफट खर्च टाळून पिंपरीतील सावली अनाथ आश्रमातील जेष्ठ नागरिकांना सुमारे (१६०) ड्रेस वाटप करण्यात आले आहे. कोरोनाच्या काळात युनूस पठाण यांनी विनाशुल्क कोरोना पाॅझिटिव्ह शंभर अंत्यविधी विविध जाती धर्मानुसार करून दिले आहे.त्यामळे युनूस पठाण यांचे कार्य अतिशय गोरगरीब जनतेसाठी आहे.आधारकार्ड,पॅन कार्ड,राशनकार्ड यांसारख्ये महत्त्वाचे पुरावे उपैक्षितांना काढून देण्यात त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. कोणत्याही मदतीसाठी ते धाऊन जातात. म्हणून त्यांची ओळख पिंपरी-चिंचवड शहरात कोविड योद्धा युनूस पठाण या नावाने आहे.जनतेचा “एक काॅल प्राब्लेम साॅल” अशी त्यांची ओळख आहे.अशी माहिती नागरिकांनी दिली आहे.
