
दैनिक चालु वार्ता अक्कलकुवा प्रतिनिधी -आपसिंग पाडवी
तालुक्यातील केलखाडी, खुर्चीमाळ, मोगरासह परिसरातील गाव पाड्यांवर गुरे दगावत असल्याने त्यांचे पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी भाजपा अनुसूचित जमाती प्रदेश उपाध्यक्ष नागेश पाडवी यांनी गटविकास अधिकारी यांच्या कडे दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
अक्कलकुवा तालुक्यात पावसाच्या अतिवृष्टीमुळे वातावरणात बदल होऊन पशुपालकाच्या पशुधनात आजाराने गुरे दगावत असल्याने तालुक्यात पशु वैद्यकीय विभागातर्फै पशुपालकाच्या पशुचे लसिकरण करून त्यांच्यावर औषधोपचार करण्याची मागणी मोगरा येथील साया वसावे व खुर्चीमाळ येथील पशुपालकांनी केली आहे.
तालुक्यातील मोगरा गावात जाहग्या अमद्या राउत,तिज्या बामण्या वसावे,दमण्या रोता वसावे,बाज्या धर्मा पाडवी,दातक्या गिंब्या वसावे, इंद्या बासरा वसावे यांचे प्रत्येकी एक एक बैल तर भांगा गोवल्या वसावे यांची दोन गायी असे पशु पालकांचे पशुधनाचे पावसाच्या अतिवृष्टीमुळे वातावरणात बदल होउन गुरांनवर आजाराने दगावत असल्याने पशुपालकाचे पशुधनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे
तरी तालुक्यात पशुपालकांच्या पशुधनावर लसिकरण करून औषधोपचार करण्यात यावा अशी मागणी साया वसावे मोगरा यांनी केली आहे.
छाया चित्र: आपसिंग पाडवी
अककलकुवा तालुक्यातील मोगरा येथे आजारामुळे अशी गुरे गोठ्यात दगावत असुन दुसर्या छायाचित्रात मोगरा येथे दगावलेल्या गुरांना दफनविधी करण्यासाठी नेताना पशुपालक