
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- गोविंद पवार
भाजपाचे नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खा. प्रतापराव पाटील चिखलीकर हे राज्यात सत्तांतर झाल्यानंतर भाजपा -शिवसेना युतीचे सरकार आल्यानंतर पहिल्यांदाच लोहा दौऱ्यावर आले असताना त्यांची भाजपा युवा मोर्चाचे लोहा तालुका अध्यक्ष बंडू पाटील वडजे यांनी खा प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात सदिच्छा भेट घेऊन त्यांचा भाजपा युवा मोर्चाच्या वतीने भव्य पुष्पहार घालून फटाक्यांची आतिषबाजी करून स्वागत केले.
यावेळी जिल्हा बॅकेचे संचालक प्रविण पाटील चिखलीकर, नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी, माजी सभापती आनंदराव पाटील शिंदे, माजी नगराध्यक्ष किरण वटटमवार, गटनेते करीम शेख, माजी सभापती शंकर पाटील ढगे, भाजपाचे युवा मोर्चाचे लोहा तालुका अध्यक्ष बंडू पाटील वडजे, अंबादास पाटील पवार, विष्णू चव्हाण, शहाजी राठोड, माधव पाटील पारडीकर,बाळू पाटील पवार, सुर्यकांत गायकवाड,बाळू पाटील कदम, उपसरपंच भानुदास पाटील पवार, आदी उपस्थित होते.