
दैनिक चालु वार्ता उदगीर / प्रतिनिधी
पर्यावरण वाढविणे आणि प्रदूषण रोखणे ही प्रत्येक नागरिकांची जबाबदारी असून ती प्रत्येकाने जबाबदारीने पार पाडली पाहिजे. झाडे लावून व स्वच्छता राखून पर्यावरणास हातभार लावला पाहिजे, पर्यावरण प्रेमी विविध सेवाभावी संस्था मित्रमंडळाने अतनूर व परिसरात जी पर्यावरण चळवळ सुरू केली आहे. ती परिसरांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याने सर्वांनी झाडे लावण्याच्या चळवळीत सहभागी होण्याचे आव्हान पर्यावरण प्रेमी मित्र बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर यांनी केले आहे. विविध सेवाभावी संस्थेच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने दि.१ जुलै ते दि,३१ जुलै च्या दरम्यान वृक्षारोपण, वृक्ष लागवड व संगोपन करण्यात येत असलेल्या शुक्रवार रोजी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा अतनूरच्या प्रांगणात वृक्ष लागवड व संगोपन करताना ते बोलत होते.
यावेळी वृक्ष संगोपन प्रेमी परिचर जी.एन.सवारे यांचा वृक्ष देवून सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यद्यापक जी.एन.शिंदे, सहशिक्षिका सौ.एम.एम.कदम, सौ.एस.बी.केंद्रे, सहशिक्षक एस.बी.येणकीकर, परिचर जी.एन.सवारे, लातूर जिल्हा युवक कुणबी मराठा मंंडळ उदगीर-अतनूर, साधूराम ग्रामीण विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अतनूर, जनक्रांती डोंगरी विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अतनूर, वसुंधरा महिला मंंडळ, जिजामाता महिला मंंडळ अतनूर, जयहिंद क्रिडा व व्यायाम शाळा अतनूर या सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थ्यांनी उपस्थित होते.