
दैनिक चालू वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
अहमदपूर
अहमदपूर शहर एक शिक्षण पंढरी म्हणून ओळखले जाते,
शहर झपाट्याने वाढत आहे,
नवीन वस्ती मध्ये तर नाली रस्ते तर नाहीत,पण शहर बसण्यामध्ये ज्या काॅलनी चा मोठा वाटा आहे, ज्या काॅलनी नगर परिषदेला कर भरतात तरी त्यांना बेसिक गरजा सुविधा पण हे नगरसेवक आणि प्रशासन सुविधा पुरवत नाहीत,
ही फार मोठी शोकांतिका आहे,
या परिस्थिती ला कुठे तरी सामाजिक बांधिलकी म्हणून लक्ष्मण अलगुले यांनी प्रत्येक काॅलनी मधील रस्त्यावर जिथे जिथे चिखल, खड्डे, कच्चे, रस्ते आहेत तिथे तिथे मजबुती करण करण्याचा स्वखर्चाने समाजसेवेचा वसा हाती घेतला आहे,
समाजामध्ये प्रत्येक जण स्वत: साठी जगतो परिवारासाठी जगतो,पण या समाजसेवकांनी या ही पली कडे जाऊन हे विश्वची माझे घर या शब्दाचे मर्म जाणले आणि आपली सेवेची सुरुवात केली,लाखो रुपये पदराचे घालुन स्वखर्चाने एक आदर्श घालुन दिला की या अश्या धावत्या युगात जिथे माणुस स्वतः व परिवारांचाच विचार करतो,समाजसेवेची जाण असणे म्हणजे युगात फार मोठी प्रेरणा आहे,शहरामध्ये अनेक राजकीय मोठ मोठी गडगंज नेते आहे,प्रबल मान्यवर आहेत हा सर्व सामाण्य कुटुंबातील नव तरुण पण ईच्छा शक्ती शहरातील जनतेसाठी शहरासाठी काही तरी खारीचा वसा उचलण्याची जिद्द ठेऊन, शहराला विकास नवी दिशा नवे विचार देण्याचे कार्य केले आहे, आणि भविष्यात कायम समाजातील प्रत्येक घटका साठी सेवाभाव ठेऊन कायम कार्य करत राहणार असा मानस ठेवणार समाजसेवक यांच्या कार्याचे शहरातील प्रत्येक नागरिकांकडून कौतुक होत आहे, शहरातील विविध काॅलनी मध्ये केलेल्या सेवा,
शिवाजी नगर थोडगारोड, नागेश काॅलनी थोडगा रोड, महात्मा बसवेश्वर नगर, सिध्दार्थ काॅलनी थोडगा रोड,या सर्व काॅलनी मध्ये गेली कित्येक वर्षांपासून बेहाल होते नागरिक कुठे खड्डे तर कुठे चिखल अशी परिस्थिती होती पण आज लक्ष्मण अलगुले यांनी स्वताच्या स्वखर्चाने शहरातील बिकट परिस्थिती वर मात करून जिद्दीने स्वतःच्या दुरदृष्टी ने शहरातील प्रभाग क्रं 4 मधील विकास केला आहे जनु काही विकासाचीच गंगा आहे येणाऱ्या काळामध्ये या पुढे कायम शहराचा कायापालट एक प्रगतशिल शहर तसेच आदर्श शहर यांच्या संकल्पनेतून व्हावे असी जनतेची इच्छा आहे शहरासाठी कार्य, सेवा देतील अशी अपेक्षा आता जनतेपुढे वाढतच चालत आआह