
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी -गोविंद पवार
लोहा तालुक्यातील मौजे खांबेगाव सेवा सहकारी सोसायटीच्या सार्वत्रिक निवडणूकीत ग्राम स्वराज्य शेतकरी विकास परिवर्तन पॅनलचा दणदणीत विजय झाला असुन ११ पैकी ११हउमेदवार भरघोस मतांनी विजयी झाले आहेत.
खांबेगाव सेवा सहकारी सोसायटीच्या सार्वत्रिक निवडणूकीत ११ जागेसाठी दि. २२रोजी जुलै रोजी सकाळी ते ४ या वेळेत मतदान झाले व सायंकाळी पाच वाजता मतमोजणी झाली यात पॅंनल प्रमुख हरी पाटील हिलाल, प्रकाश पाटील कुंटे, माजी चेअरमन केशव पाटील हिलाल यांच्या नेतृत्वाखालील ग्राम स्वराज्य शेतकरी विकास परिवर्तन पॅनलचा दणदणीत विजय झाला असुन ११पैकी११ जागेवर त्यांचे उमेदवार भरघोस मतांनी विजयी झाले व विरोधी पॅनलचा धुव्वा उडविला असून विरोधकाला भोपळा ही फोडता आला नाही मतदारांनी ग्राम स्वराज्य शेतकरी विकास परिवर्तन पॅनलला स्विकारले असुन ग्राम स्वराज्य शेतकरी विकास परिवर्तन पॅनलचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे:- हरीदास पाटील हिलाल,नागेश पाटील हिलाल,परशराम पाटील हिलाल, प्रकाश पाटील कुंटे,रावण पाटील पौळ, संभाजी अन्नकाडे,आनंता हिलाल, मारोती पौळ, मुक्ताबाई हिलाल, कौशाबाई हिलाल हे १० उमेदवार विजयी झाले आहेत तर या अगोदर भागिरथाबाई मरीबा मुळे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन आ. श्यामसुंदर शिंदे, शेकापच्या महिला प्रदेशाध्यक्षा सौ. आशाताई शामसुंदर शिंदे, जि.प. सदस्य हंसराज पाटील बोरगावकर, पॅनल प्रमुख हरी पाटील हिलाल, प्रकाश पाटील कुंटे, माजी चेअरमन केशव पाटील हिलाल,मा.सरपंच संदीप पाटील पौळ, तंटामुक्तीचे अध्यक्ष संजय पाटील हिलाल, अरुण पाटील कुंटे, नारायण पाटील हिलाल, तुळसीराम पाटील लुंगारे, मारोती पाटील हिलाल,जलील शेख, पांडुरंग माने, शामराव पाटील हिलाल यांच्यासह गावकरी मंडळीने केले आहे.
पॅनल प्रमुख माजी चेअरमन केशव पाटील हिलाल यांच्या नेतृत्वाखाली सलग २५ वर्षापासून खांबेगाव सेवा सहकारी सोसायटीवर त्यांची एकहाती सत्ता आली असून यावेळी पॅनल प्रमुख माजी चेअरमन केशव पाटील हिलाल यांनी स्वतः निवडणूक लढविली नसुन त्यांचे सुपुत्र नागेश पाटील हिलाल यांनी ही निवडणूक लढवून विजयी झाले आहेत व युवा नेतृत्वाला त्यांनी संधी दिली आहे.
शेकापचे तालुका अध्यक्ष नागेश पाटील हिलाल व शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुरेश पाटील हिलाल यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती व हे दोन्ही युवा नेत्यांनी एकमेकां विरुद्ध पॅनल करून निवडणूक प्रतिष्ठेची केली होती व या निवडणुकीत आ. शामसुंदर शिंदे यांचे खंदे समर्थक शेकापचे तालुका अध्यक्ष नागेश पाटील हिलाल यांनी एकतर्फी विजय खेचून आणला आहे.