
दैनिक चालू वार्ता जव्हार प्रतिनिधी-दिपक काकरा.
जव्हारः– सध्या शासनाचा “मिशन झिरो ड्रॉप आऊट” अंतर्गत शाळाबाह्य,अनियमित, स्थलांतरित मुलांसाठी महाराष्ट्रात मुलांची शोध मोहीम चालू असून यामुळे जांभूळविहीर गावचे शिक्षणप्रेमी व ग्रापंचायत रायतळे सदस्य गजानन सहाणे व त्यांच्या मातोश्री ग्रामपंचायतीच्या सदस्या गिताताई सहाणे यांनी जि.प शाळा जांभूळविहीर येथे संपुर्ण शाळेतील मुलांना दप्तर वाटण्याचा निर्णय घेतला.राज्य शासनाच्या या अनोख्या उपक्रमाची दखल घेत शाळेतील पदवीधर शिक्षक भाऊसाहेब शेटे यांनी शाळाबाह्य सर्वेक्षण करताना गिता सहाणे व गजानन सहाणे यांच्या कानावर घातली.जांभुळविहीर शाळेतील संपूर्ण विद्यार्थी आदिवासी भागातील असून बहुतेक मुलांचे पालक हे मजूर आहेत.त्यामुळे त्यांनी ह्या शाळेची दखल घेऊन ग्रामपंचायत सदस्यांनी शालेय साहीत्य व दप्तर देण्याचा निर्णय घेतला.त्यामुळे शाळेचे मुख्याध्यापक छाया शेटे यांनी रायतळे ग्रामपंचायतीच्या या माता पुत्रांचे आभार मानून शाळेला केलेल्या सहकार्य बद्दल धन्यवाद दिले
ग्रामपंचायत सदस्यांच्या सहकार्याने शाळेत राबविलेल्या या अनोख्या उपक्रमाची दखल घेत पंचायत समिती शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी चौधरी यांनी देखील जि.प शाळा जांभूळविहीर शिक्षक भाऊसाहेब शेटे व सहशिक्षक यांचे कौतुक केले.