
दैनिक चालु वार्ता कोरपना तालूका ग्रामीण प्रतिनिधी-प्रदिप मडावी
कोरपना तालूका गडचांदूर
नवीन कंपनी कायदा 2013 नुसार शासनाने सर्व उद्योगांना सामाजिक ऋणनिधी सीएसआर खर्च करणे बंधनकारक केले आहे मात्र गडचांदूर पंचकोशीच्या माणिकगड सिमेंट अल्ट्राटेक चे युनिट क्रमांक दोन अंतर्गत येणाऱ्या या प्रकल्प बाधित क्षेत्रातील गोवारी गुडा बॉम्बेझरी पाटागुळा लिंगनडोह ही गावे कुसुंबी माईन क्षेत्रातील असताना विकासापासून कोसो दूर आहे या ठिकाणी कंपनीने गोवारी गुडा येथे शौचालय बांधकामाचा फज्जा उडाला असून निकृष्ट बांधकामे करण्यात आली त्याचा वापरच होत नाही तर उर्वरित गावात एक रस्ता देखील धड दिसून येत नाही कोणत्याच प्रकारचे विकास कामे माईन्स एरियाच्या गावात झालेली नाही अल्ट्राटेक अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या माणिकगड युनिट मात्र सामाजिक दायित्व निधी नियमाचे उल्लंघन करताना दिसते माणिकगड कंपनीच्या हाकेच्या अंतरावर असलेले थुट्रा वरझडी हिरापूर सोनापूर मानोली बैलमपूर नोकारी या गावात दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या दुसरी सिमेंट कंपनी फाउंडेशनच्या माध्यमातून जलसंधारण सामाजिक सभागृह महिला सक्षमीकरण महिलांचे आरोग्य कौशल्य रोजगार इत्यादी उपक्रम राबवून गावकऱ्यांना विकासाच्या प्रवाहामध्ये जोडण्याचा प्रयत्न करीत असताना मात्र अल्ट्राटेक युनिटला सामाजिक दायित्वाचा व लोक कल्याणाचा उपक्रम राबविण्याचा भान राहिलेला नाही असा अनुभव या गावातील नागरिक घेत आहे गेल्या पाच वर्षातील कंपनीने मिळवलेल्या नफ्याचे दोन टक्के निधी खर्च करणे अपेक्षित होते मात्र ही कंपनी स्वतःच्या शैक्षणिक संस्था व आपल्या परिसराच्या विकासामध्ये खर्च घालून लगतच्या गावाच्या नागरिकांच्या माथी धूळ प्रदूषण वायू प्रदूषण पाणीटंचाई आजार लोकांच्या दारी टाकण्याचं काम करीत आहे जगाच्या पातळीवर पर्यावरण संतुलन व तापमान कमी करण्यासाठी वृक्ष लागवडीची मोहीम राबवून ओसाड रान रस्ते परिसर हरित करण्याचे प्रयत्न होत असताना मात्र अल्ट्राटेक सिमेंट कंपनीने प्रकल्पालगत सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी शेकडो झाडांची कथल केली माईन्स एरियामध्ये धूळ प्रदूषणाने व वेस्ट मटेरियल टाकून जंगल नष्ट करण्याचे काम जोरात सुरू असून कंपनी सर्व नियम धाब्यावर ठेवून पायमल्ली करत असल्याचे पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या निरीक्षणातून उघड झाले आहे कंपनी स्वतःच्या आर्थिक लाभ करून घेण्यासाठी नागरिकांची दिशाभूल करीत असल्याने माणिकगड कंपनीच्या सामाजिक दायित्व निधीच्या उपक्रम लोकांच्या तोंडाला पाणी पुसणारा असून 2007 मध्ये सी एस आर फंड स्वतःचा भांडवली खर्च दाखवण्यात आला ज्या शहरात हा उद्योग उभा आहे त्या गडचांदूर मध्ये शैक्षणिक विकासात्मक व आरोग्याच्या दृष्टीने भरीव कामगिरी पुढाकार घेऊन कंपनीने केल्याचे दूरपर्यंत चित्र दिसत नाही हे विदारक परिस्थिती गावावर आल्याचे अनेक तक्रारी सामाजिक संघटना व गावकऱ्यांनी केल्या नागरिकांना कंपनीच्या मनमानीचा कमालीचा त्रास सहन करत गावकरी कंपनीच्या कारभाराचा वेळोवेळी निषेध करत आहे यापुढे तरी इतर कंपन्यांचा आदर्श घेऊन सकारात्मक विकासासाठी ही कंपनी पहल करेल काय असा प्रश्न अनेक लोकप्रतिनिधी ग्रामपंचायतचे पदाधिकारी व गडचांदूर शहराचे सुज्ञ नागरिक विचारू लागले आहे