दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी सांगली- संभाजी गोसावी
सांगली जिल्ह्यांचे नवे जिल्हाधिकारी डॉ. मंताडा राजा दयानिधी यांचे राज्य शासनाने शुक्रवारी सांगली जिल्हाधिकारी पदी नियुक्ती केली असून सध्यांचे जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांचे औरंगाबाद महानगरपालिका आयुक्त पदावर नियुक्ती करण्यांत आली. राज्यात शिंदे सरकार आल्यानंतर बदल्यांना स्थगिती देण्यात आली होती मात्र शुक्रवारी पुन्हा नव्यांने बदल्यांचे आदेश जारी करण्यांत आली यामध्ये सातारा, सांगली यांच्यासह अन्य जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांच्या बदल्यांचे शिंदे सरकारकडूंन आदेश जारी करण्यांत आले. सांगलीचे नवे जिल्हाधिकारी हे पंजाब तेलंगणाचे सुपुत्र आहेत ते २०१४ मधील आयएएस अधिकारी आहेत त्यांनी नाशिक जिल्ह्यांपासून आपल्या सेवेस प्रारंभ केला होता. त्यानंतर ते चंद्रपूर येथे आदिवासी कल्याण विभागांत कार्यरत होते तेथून गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्याधिकारी म्हणूनही त्यांनी आपल्या कामाचा चांगला ठसा उमटविला होता. आता त्यांना राज्य शासनांने सांगली जिल्ह्यांची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविली आहे. डॉ. चौधरी यांनी सांगली जिल्हाधिकारी पदाचा २०१९ मध्ये पदभार हाती घेतला होता. काही महिन्यांतच महापुरावेळी त्यांनी प्रभावी कामगिरी केली त्यानंतरच्या महापूर व कोरोना कालावधीतही त्यांच्या कामाची सर्वत्र प्रशंसा झाली. स्वता डॉक्टर असल्यांने कोरोना कालावधीत त्यांनी रुग्णावरील उपचारांचे चांगलेच नियोजन केले होते. त्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा व रुग्णांना बीड मिळण्याबाबत जिल्ह्यात कोणतीही अडचण आली नव्हती स्वच्छ व परदेशी कारभारामुळे त्यांनी सांगली जिल्ह्यामध्ये तीन वर्षाहून अधिक काळ त्यांना काम करण्याची संधी मिळणारे पहिलेच जिल्हाधिकारी ठरले त्यामुळे सांगलीकरांना माझी आठवण नक्कीच राहील असे आपले मावळते जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी दैनिक चालू वार्ताशी बोलताना दिली. यावेळी नव्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगली जिल्ह्यांचा पदभार सोपविला आहे.
