
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी भूम-नवनाथ यादव
भूम : पत्रकार परिषदेत गटनेते संजय गाढवे म्हणाले,भूम शहरातील विरोधक राजकीय हेतू समोर ठेवून कायम विरोध करत आहेत . मी त्यांच्या विरोधाला महत्त्व देत नाही . जनतेच्या इच्छेप्रमाणे शहरात विकास कामे राबविणे यालाच मी प्राधान्य देतो . आ प्रा डॉ तानाजीराव सावंत यांच्या मदतीने शहराचा आणखी कायापलट करणार . असे भूम नगरपालिकेचे माजी गटनेते संजय गाढवे यांनी म्हटले . ते भूम येथील साहिल कॉम्प्लेक्स येथे आयोजित पत्रकार परिषदेत रविवार दि 24 रोजी बोलत होते . यावेळी श्री गाढवे यांनी २०१७-२०२२ या काळात केलेल्या विकास कामांची माहिती दिली . पुढे श्री गाढवे म्हणाले की , शहरात राबविण्यात आलेल्या विकास कामांची माहिती सर्व सामान्य जनतेसमोर जावीत यासाठी ही पत्रकार परिषद घेतली आहे . मी जाहीरनाम्याची वचन पूर्ती केली आहे . जनतेला गत निवडणुकीत जो जाहीरनामा दिला त्यातील बहुतांश कामांची वचनपूर्ती मी केलेली आहे . आ सावंत यांच्या माध्यमातून या अडीच ते तीन वर्षात मोठ्या प्रमाणत निधी व कामे भूम नगरपालिका अंतर्गत केली . 2020 पर्यंत चाळीस ते पन्नास कोटी रुपयांची कामे शहरात केली आहेत . शहरातील आठवडी बाजाराचा कायापालट केलेला असून हा आठवडी बाजार मराठवाड्यातील सर्वात मोठ्या आठवडी बाजारांपैकी एक ठरला आहे . याठिकाणी व्यापाऱ्यांना माल घेऊन बसण्यासाठी कट्टे , शेड , लाइट , पाणी या सुविधा दिल्या आहेत . शहरातील जुने असुरक्षित शॉपिंग सेंटर पाडून नवीन संकुल उभारले आहे . त्यामुळे व्यापाऱ्यांची संख्या वाढली आहे . उद्योग उभारू इच्छिणाऱ्या युवकांना ती चांगली संधी निर्माण झाली आहे . भूम ते परंडा रोड वरती अलमप्रभू चौक येथे ओव्हर ब्रिज उभारण्यात आला आहे . त्यामुळे पालक आणि भाविकांची मागणी पूर्ण होऊन भाविक आणि विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय दूर झाली आहे . रात्री लाईट गेल्यास गैरसोय होऊ नये यासाठी शहरात सोलर दिवे बसविण्यात आले आहेत . शहरात पन्नास टक्के सोलर चे दिवे बसवण्यात आले आहेत . मागील अडीच वर्षांच्या कालावधीत. मागेल त्या विकास कामासाठी निधी आ सावंत यांच्या माध्यमातून मिळालेला आहे . शहराच्या विकास कामासोबतच प्रामुख्याने लाईट , पाणी , गटार या गरजांना नागरिकांच्या मागणीनुसार प्राधान्य दिले आहे . बाणगंगा नदीचे ,रुंदीकरण , खोलीकरण,सुशोभीकरण , शहरातील चौक सुशोभीकरण वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून करण्यात आले आहे . नागरिकांनी सांगितलेली कामे करण्यास प्राधान्य देत असल्यामुळे शहरातील नागरिकांचा पूर्णपणे विश्वास बसलेला आहे . राजकीय विरोधक हे विरोधासाठी विरोध करत आहेत . मी त्यांना महत्व देत नाही . मला जनता महत्वाची आहे . शहरांतर्गत डांबरीकरण , पेव्हर ब्लॉक चे काम , कॉम्प्लेक्स उभे केले . ही कामे वैशिष्ट्य पूर्ण आणि विशेष वैशिषटयपूर्ण योजनेतून कामे पूर्ण करण्यात आली आहेत . सावित्री फुले सभागृह , महिला व पुरुष यांच्यासाठी स्वतंत्र जिम यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडली आहे . शहरातील अनेक तरुणांना रोजगार निर्माण करण्यासाठी मदत केलेली आहे असेही त्यांनी सांगितले . पुढे ते म्हणाले की , दलीत वस्ती सुधार योजना त्या त्या भागात राबविली आहेत . दलित वस्तीची कामे नियमानुसार होत असताना विरोधकांकडून नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला . शहरात विशेष रस्ता अनुदान योजनेतून काँक्रीटीकरण , डांबरीकरण , पेवर ब्लॉक ची कामे मोठ श प्रमाणात करण्यात आली आहेत . शहरात पाच ठिकाणी प्रवाशी निवारा शेड उभारले आहेत . अलमप्रभू रस्ता २०१६-१७ मध्ये केला होता . तो रस्ता आजही सुस्थितीत आहे . विरोधकांना विरोध करण्याचे आवाहन यावेळी केले . विरोधक नुसत्या विकासाच्या गप्पा मारत आहेत . विकास निधी मात्र त्यांना आणता येत नाही . २५ वर्ष घरात यांच्या आमदारकी होती . मात्र मतदार संघाचे साधे रस्तेही यांना करता आले नाहीत . याकाळात किती लोकांना रोजगार दिला ते विरोधकांनी सांगावे असे आवाहनही त्यांनी केले . यावेळी श्री गाढवे यांनी माजी आ राहुल मोटे यांच्यावर टीका केली.यावेळी जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या संयोगिता गाढवे, युवा नेते साहिल आप्पा गाढवे, माजी नगरसेविका मेहराज बेगम सय्यद , सारिका थोरात , माजी उपनगराध्यक्ष तोफिक कुरेशी , माजी नगरसेवक संजय देवडीकर , किरण जाधव , बबलू बागवान , आश्रुबा नाईकवाडी भूम शहर विकास आघाडीचे अध्यक्ष संजय साबळे , उपाध्यक्ष वस्ताद मामु जमादार, सचिव सूरज गाढवे , माळी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष बालाजी माळी, संदिप मोटे, सुमित तेलंग, शब्बीर सय्यद, बालाजी अंधारे, पं.स.चे माजी उपसभापती रामकिसन गव्हणे, चांगदेव शेंडगे, मुशिर शेख, राकेश जाधव, आश्रू चौधरी,पत्रकार बांधव ,आलंप्रभू शहर विकास आघाडीचे पदाधिकारी,विकासरत्न संजय गाढवे प्रतिष्ठानचे मित्र परिवार, पदाधिकारी उपस्थित होते