
दैनिक चालु वार्ता चाकुर प्रतिनिधी -नवनाथ डिगोळे
चाकूर (प्रतिनिधी) मागे काही दिवसात भारतामध्ये इस्लामिक कट्टरतावाद्यांकडून हिंदू समाजातील काही लोकांची क्रूरपणे हत्या करून अराजकता माजविण्याचा प्रयत्न होत असल्याने सकल हिंदू समाजामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून त्याच्या निषेधार्थ चाकूर येथे दि,24 जुलै रोजी सकल हिंदू समाजाच्या वतीने विराट मूक मोर्चा काढून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
सदरील मोर्चा हा लातूर जिल्ह्याचा एकत्रित मूक मोर्चा होता, चाकूर शहरातील आझाद चौकातील श्री बालाजी राम मंदिर येथून प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये प्रभू श्री रामचंद्राच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून या मूक मोर्चाची सुरुवात करण्यात आली हा मूक मोर्चा मुख्य बाजारपेठेतून स्वामी विवेकानंद चौक, कमानी पासून बोथी रोड, नवीन बस स्थानक, विश्वशांती धाम मंदिर येथे या मूक मोर्चाचे रूपांतर सभेमध्ये झाले यावेळी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री श्री विलास खिंडे यांनी आपल्या भाषणात म्हणाले की राजस्थान राज्यातील उदयपूर येथील कन्हैयालाल(टेलर) या व्यक्तीची आणि महाराष्ट्र राज्यातील अमरावती येथील उमेश कोल्हे, या व्यापाऱ्याची इस्लामिक जिहादी कट्टर वाद्याकडून निर्घुणपणे हत्या करण्यात आली या घटनेमुळे संपूर्ण भारतामधील सकल हिंदू समाजामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे, हिंदू समाज हा संविधानावर चालणारा असून कायद्याचे पालन करणारा आहे,हिंदू समाजावर होत असलेल हल्ले गंभीर स्वरूपाचे असून केंद्र सरकारने व राज्य सरकारने अशा जिहादी कट्टर वाद्यांचा बंदोबस्त करावा, उदयपूर व अमरावती येथील हत्याकांडातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, भविष्यात असे हल्ले झाल्यावर हिंदू समाजाचा उद्रेक होईल,असा इशारा जिल्हा मंत्री विलास खिंडे यांनी दिला आहे, या मूक मोर्चाला चाकूर तालुक्यासह लातूर, रेणापुर,उदगीर,औसा, निलंगा, देवणी, जळकोट, अहमदपूर, शिरूर आनंदपाल सह ग्रामीण भागातील हजारो हिंदू समाज बांधव उपस्थित होते, यावेळी समाज बांधवांच्या वतीने नायब तहसीलदार श्री, रोहन काळे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले, या मूक मोर्चा बंदोबस्तासाठी सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम,पोलीस निरीक्षक बालाजी मोहिते,यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.