
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे.
देगलूर:देगलूर : शहरातील लाईन गल्ली परिसरात २२ जुलै रोजी झालेल्या चोरीच्या घटनेचा तपास देगलूर पोलिसांनी दोनच दिवसात उघड केला. तसेच आरोपीस गजाआड केल्याने पोलिसांच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त होत आहे.
सखुबाई माधव गुज्जलवाड यांच्या राहत्या घरी २२ जुलै रोजी अज्ञात व्यक्तीने घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. तसेच घरातील चांदीचे पंधरा तोळे वजनाचे चैन व वीस तोळे वजनाचे चांदीचे दंड कडे ज्यांची एकूण किंमत पंधरा हजार रुपये, सोन्याचे चार ग्रामचे मनी मंगळसूत्र, रोख रक्कम ३० हजार रुपये असा एकूण ६१ हजार रुपयांचा मुद्देमाल लांबविला होता. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक सूर्यवंशी
आरोपी शिवाजी चंद्रकांत आरगुलवार (वय २२) व्यवसाय मच्छी विक्री राहणार भोई गल्ली देगलूर यास ताब्यात घेऊन गुन्हा संबंधाने विचारपूस केली असता आरोपीने चोरी केल्याचे मान्य करीत गुन्हा कबूल केला. त्यानुसार संबंधित आरोपी विरुद्ध देगलूर ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आली. सदर आरोपीस न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २६ जुलै रोजी पर्यंत आरोपीस पोलीस कोठडी दिली आहे.यांच्याकडे दिला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे तसेच पोलीस निरीक्षक सोहन माछरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास केला.