
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
नांदेड :- अतिवृष्टी झाल्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास शाखा नांदेडच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. त्यात म्हटले की, अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्हात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना दर हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी. दुबार पेरणीसाठी बि-बियाणे, खते उपलब्ध करून द्यावेत, विज बिल दरवाढ रद्द करावी. पीककर्जामध्ये वाढ करून तत्काळ मंजुरी द्यावी, आदि मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. निवेदनावर डॉ. बालाजी कोपलवार , अॅड. धोंडीबा पवार, चंद्रशेखर अय्यर, दत्ताजी तुमवाड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.