
दैनिक चालु वार्ता नीरा नरसिंहपूर प्रतिनीधी – बाळासाहेब सुतार
ठिबक सिंचनामुळे पिकाच्या उत्पादन सरासरी 20 ते 30 टक्के वाढ होते. शिवाय वेळेवर व योग्य पाणी मिळाल्यामुळे पिकांचा दर्जा वाढतो. ठिबकमधून विद्राव्य खते पिकांना देता येतात. परिणामी खतांची मुबलक मात्रा बसून पिक जोरदार येते. पिकांचा पक्क होण्याचा कालावधी कमी होऊन कमी कालावधीत पीक तयार होते व काढता येते. पारंपरिक पद्धतीने पाणी द्यायचे ठरल्यास जमिनीचे सपाटीकरण करावी लागते. कारण त्याशिवाय दंडातून पाणी पीका पर्यंत पोहोचत नाही. मात्र ठिबकमुळे जमीन सपाट करण्याची गरज पडत नाही. म्हणजे हा सर्व खर्च वाचतो चढ उताराच्या जमिनीवर फळ झाडे लावता येऊ शकतात असे मार्गदर्शन कृषिदूत पृथ्वीराज देशमुख,शिवम शेंडे,प्रसाद काळे, प्रसन्नजीत देशमुख ,गौरव वाघ ,शिवराज देशमुख ,शिवतेज शेंडगे, वैभव देशमुख यांनी शेतकऱ्यांना केले
या प्रात्यक्षिकेच्या आयोजनासाठी शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संचलित रत्नाई कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य आर जी नलावडे,कार्यक्रम समन्वयक प्राध्यापक एस एम एकतपुरे ,कार्यक्रम आधिकारी प्राध्यापक एस एल मसकर प्राध्यापक एम एम चंदनकर(सहाय्यक प्राध्यापक कृषी शास्त्र विभाग) यांचे मार्गदर्शन लाभले.