दैनिक चालू वार्ता गंगापूर प्रतिनिधी-सुनिल झिंजूर्डे पाटील
गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीउत्सव समितीच्या अध्यक्षपदी संदीप आमरावं तर उपाद्यक्षपदी ग्रामपंचायत सदस्य मयूर जैस्वाल, रामनाथ आव्हाड यांची एकमताने निवड करण्यात आली.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकात आज जयंती समिती निवड करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्यात एकमताने समाजबांधवांच्यावतीने यां निवडी करण्यात आल्या उर्वरित कार्यकारिणी पुढीलप्रमाणे कार्याद्यक्ष प्रभू बागुल, कोष्याध्यक्ष दीपक हरिसचंद्रे,अम्मुभाई शेख स्वागतद्यक्षपदी शिवसेना महिला आघाडीच्या तालुका कार्याद्यक्ष अर्चना सोमासे व अर्चना नाडे,सचिव ग्रामपंचायत सदस्य अशोक सौदागर, सहसचिव योगेश सौदागर यांच्या निवडी करण्यात आल्या व अद्यक्ष व उपाद्यक्ष तसेच सदस्यांचे शाल, हर देऊन सत्कार करण्यात आले.
दरम्यान यावेळी बाजार समितीचे संचालक सुनिल पाखरे, प्रा. कल्पेश गायकवाड, शिवसेनेचे नितीन पाटील कांजूने,स्मारक समितीचे अद्यक्ष गोविंद शेलार,गायरान हक्क समितीचे अद्यक्ष प्रशांत मुंनवर,कडूभाऊ शेलार,अक्षय खेत्रे, भाऊसाहेब खेत्रे,भाऊसाहेब थोरात,टायगर ग्रुपचे सुरेश साळुंके,रवी गायकवाड पत्रकार फिरोज मन्सूरी, गुलाब वाघ आदिसह समाजबांधवांची मोठ्या प्रमाणावर बैठकीला उपस्थिती होती.
प्रतिक्रियां :- संदीप आमरावं (अद्यक्ष, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती समिती )लासूर स्टेशन येथील लोकशाहीरांची जयंती ऐक आगस्टला असल्याने मान्यवरांच्या शुभहस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून समजबंधव व नागरीकांच्या वतीने अभिवादन करण्यात येईल व दहा ऑगस्टला भव्य वाहन रॅली, अन्नदान,व्याख्यान होणार असून संध्यकाळी भव्य अशी वाजत गाजत मिरवणूक काढण्यात येईल असे पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
