
दैनिक चालू वार्ता किनवट प्रतिनिधी- दशरथ आंबेकर
ईस्लापुर भागात मागील आठ दिवसांपासून संततधार झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीसह जनजीवन विस्कळित झाले आहे.या अतिवृष्टीमुळे ईस्लापुर व शिवनी मंडळात मोठ्या प्रमाणात नुकसान नुकसान झाले असून शेतीतील पिकें खरडुन तर काही पिके कोंब येऊन नष्ट झालेली आहेत.काही गावात पुरजन्य परिस्थिती निर्माण होऊन शेतीसह पिकांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात जीवीत हाणी झाल्याने त्यांना केवळ पंचनामे करून चालणार नाही तर शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची गरज आहे.शेतकऱ्यांवर कोसळलेल्या नैसर्गिक संकटामुळे मोठे आर्थिक नुकसान होऊन आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.अतिवृष्टीनेग्रस्त शेतकऱ्यांना पिकांचे पंचनामे न करता तात्काळ मदतीची गरज आहे.आर्थिक मदत द्यावी अशी मागणी माजी आमदार प्रदीप नाईक यांनी केली आहे. यावेळी उपस्थित प्रकाश गब्बा राठोड , शिवराम जाधव , जयवंत वानोळे , मनोज राठोड , शिवाजी बोटेवाड , साहेबराव गुंजकर पत्रकार गणेश जयस्वाल , प्रमोद जाधव , सुदाम साखरे , निर्गुण पाटील कदम प्रतिष्ठित नागरिक यावेळी उपस्थित होते.