
दैनिक चालू वार्ता किनवट प्रतिनिधी -दशरथ आंबेकर
किनवट तालुक्यातील ग्रामपंचायत गावठाण हद्दीतील व नवीन विस्तार वाढीच्या मालमत्तेचे खरेदी व विक्री व्यवहार हे काही दिवसांपासून बंद होते.
सर्व सामान्य नागरिकांना यांचा फटका बसू नये म्हणून काही दिवसांपूर्वी पवार यांनी निवेदनाद्वारे चालू करण्याची माागणी केली होती.
खेडे, गाव विकास संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष विनोद पवार यांच्या मागणीला यश आले आहे.
मालमत्तेचे खरेदी व विक्री व्यवहार आता चालू करण्यात आले आहे .
परंतू त्यांना लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी लोकांना अनेक प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
सर्व सामान्य नागरिकांना कशाही प्रकारची होणारी हेडसाळ हे खपवून घेतल्या जाणार नाही असे प्रतिनिधींशी बोलताना पवार यांनी म्हटले आहे.
ज्या कागदपत्रांची आवश्यकता आहे ते कागदपत्रे विलंब न करता देण्यात यावे असेही पवार यांनी मतं व्यक्त केले.