
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
श्री संतशिरोमणी सावता माळी महाराज यांची पुण्यतिथी शेटफळ हवेली येथे उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. येथील संत शिरोमणी सावता माळी प्रतिष्ठान च्या वतीने मंदिरात कीर्तन, भजन, महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती शेटफळ हवेली येथील समाज श्री.संत सावतामाळी प्रतिष्ठान च्या वतीने देण्यात आली आहे .
‘आपल्या दैनंदिन जीवनाच्या कामाच्या अनुभवातून देवाची भक्ती करू पाहत संत सावता माळी जाती-जातीतून भगवद्भक्तीचा गंध फुलवत होते. ज्ञानदेव, नामदेवांच्या काळात सावताबाबा आपल्या रोजच्या उद्योगालाच हरिभक्ती समजून त्यात पूर्णपणे रंगून गेले होते. पूर्णवेळ बागकाम करणारे सावताबाबा आपल्या नित्य उद्योगात रत होऊन जात आणि चित्तात भगवंताचे स्मरण ठेवत. देव सदासर्वकाळ तुमच्या सान्निध्यातच वसतो, हे तत्त्व त्यांनी आपल्या आयुष्यभराच्या व्यवहाराने सामान्य जनांच्या मनावर ठसवले.’
असे थोर संत श्री.संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त शेटफळ हवेली येथील आबासाहेब भोंगळे यांच्या निवासस्थानी गेली शेकडो वर्षांपासून या पुण्यतिथीचे आयोजन करण्यात येते तीच परंपरा येथुन पुढेही याच ठिकाणी चालु राहील असे समाज बांधवांनी सांगितले.