
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- संभाजी गोसावी .
सातारा
शाहूपुरी पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये राजवाडा परिसरांमध्ये नगर वाचनालया जवळ दिनांक ६/०२/२०२२ रोजी रात्री दहाच्या सुमारांस अज्ञांत चोरट्यांने फिर्यादी यांच्या घरांमध्ये आधारांचा फायदा घेत अज्ञांत चोरट्यांनी घरात प्रवेश करीत. त्याचा मोबाईल हँडसेट व रोख रक्कम चोरुन नेल्यांची तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यांत दाखल झाली होती. सदर गुन्ह्यांच्या अनुषंगाने शाहूपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस पथक चोरट्यांच्या व चोरीस गेलेल्या मालाचा शोध घेत असतानाच गुन्ह्यांतील चोरीच गेलेल्या मोबाईल हँडसेटच्या तांत्रिक माहितीवरुन सदरची चोरी मंगळवार पेठ सातारा येथील पापाभाई पत्रेवाला चाळ येथील एका युवकांनी चोरी केल्यांची माहिती पोलीस तपासांत समोर आली. त्या अनुषंगाने पोलिसांनी त्यांस ताब्यांत घेवुन पोलीस ठाण्यांत आणून विश्वांसात घेवुन त्याने चोरी केल्याची पोलिसांना कबुली दिली त्याच्याकडूंन सदरच्या गुन्ह्यांमध्ये चोरलेला मोबाईल हँडसेट पोलिसांनी हस्तगत केला सदर चोरीचा गुन्हा शाहुपुरी पोलिसांनी उघडकीस आणला. सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्संल, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोहाडे,सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रीमती. आँचल दलाल मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत बधे,पोलीस उपनिरीक्षक अभिजीत यादव,गुन्हे प्रकटीकरण शाखेचे हसन तडवी,शैलेश फडतरे, पो.कॉ सचिन पवार, पो.ना. स्वप्निल कुंभार अमित माने,ओंकार यादव स्वप्नील सावंत आदीं पोलीस कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला.