
दैनिक चालु वार्ता कोरपना तालूका ग्रामीण प्रतिनिधी-प्रदिप मडावी
कोरपना तालूका गडचांदूर
अल्ट्राटेक सिमेंट कंपनीकुसूंबी माईन्स बि ब्लॉक लगत ५०० मीटरपेक्षा कमी अंतरावर आदीवासी लोकवस्ती आहे तर खदानीपासून १ कि, मी अतंरावर लिगनं डोह हे ११० घराची लोकवस्ती आहे मात्र मगझीनद्रव्य वापर करुण दगडफोडण्यासाठी स्फोटके सर्रास वापर केल्या जात असताना पोलीस प्रशासन मायनिगंब्यरो निरीक्षण करताना नियमाचे पालन केले नसल्याने नागरीकाच्या जिवाशी खेळ माडंल्या जात असल्याचा आरोप उत्तम पवार, विजय चव्हाण शंकर आडे यांनी केला असुन घरावर दगडाचा वर्षाव गुराढोराना दुखापत हे नित्याचा प्रकार सुरू असून ब्लास्टीगच्या हादऱ्यामुळे अनेक घराना भेगाजात असून गावातील ३ घरे पावसाने कोसळली सुदैवाने जिवितहानी झाली नाही मात्र कंपनीला नियमाचा विसर पडला असताना पाळीव प्राणीचा खानपरिसरात चराईसाठी वावर असतो वनपर्यावरण नियम व तिव्र स्फोटके वापर करण्यासाठी नियम असताना १ कि मी व ५०० मीटर अंतरावर लोकवस्ती असताना ब्लास्टीगं चा वापर होतो कसा व या मागे कोनाचा पाठबळ आहे असा प्रश्न आदीवासी व भटक्या जमातीकडून उपस्थीत केल्या जात असताना कंपनीला २६४ हेक्टर क्षेत्रात चुनखडी लाईम स्टोन उत्खनन करीता २०३१पर्यंत लिज करार असताना ते सर्वे नंबर कोनते क्षेत्र व नकाशा वेगळ्या ठिकाणी असताना कंपनी ४ ब्लॉकमध्ये चुनखळी उचल करीत असताना खनिकर्म विभाग डोळेझाक का करीत आहे कंपनीच्या मनमानीमुळे . कुसूंबी व लिगंनडोह या गावात भितीचे वातावरण निर्माण झाले कंपनीकडून सुरक्षेचे उपाय केले नसल्याने वण्यप्राणी पाळीव प्राणी व मानवजातीच्या जिवावर टांगती तलवार आहे अनेक शेतकरीखदानी लगत असल्याने स्फोट होताच शेतामध्ये दगडी चिलपाड पडत असल्याने पिकाचे नुकसान होत आहे जनसत्याग्रह संघटनेचे अध्यक्ष आबिद अली यांनी संचालक खनिकर्म विभाग नागपूर यांचेकडे तक्रार करूण चौकशी मागणी केली आहे