
दैनिक चालू वार्ता परभणी प्रतिनिधी – दत्तात्रय वामनराव कराळे
“””””””””””””””””””””””””””””””””””””””””””
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त शहरात सर्वत्र ” हर घर तिरंगा ” अभियान अगदी उत्साहात व जोमाने राबविले जावे यासाठी परभणी महापालिकेच्या वतीने नुकताच एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरील बी. रघुनाथ सभागृहात आयोजित सदर बैठक आयुक्त देविदास पवार यांच्या अध्येक्षतेखाली संपन्न झाली. त्यावेळी सहाय्यक आयुक्त…………व आरोग्य अधिकारी………यांचीही उपस्थिती होती.
परभणी महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर बैठकीत मनपा आयुक्त देविदास पवार यांनी मौलिक मार्गदर्शन करुन आगामी दि. १३ ते १५ ऑगस्ट २०२२ दरम्यान “हर घर तिरंगा” हे अभियान जोमाने राबविले जावे यासंबंधीचे आवाहन केले. देशभर हे अभियान अगदी उत्साहाने राबविले जाणार आहे. परभणी शहरात सुध्दा त्याच जोमाने राबविले जाईल अशी अपेक्षा व्यक्त करुन या कामी नियमांचे व आदेशाचे उल्लंघन होणार नाही याची प्रत्येकाने दक्षता घेणे अनिवार्य असल्याचे सख्त आदेशही आयुक्त पवार यांनी दिले.