
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भूम:-कारगिल युद्धा दरम्यान भारतीय लष्कराने ऑपरेशन विजय अंतर्गत घुसखोरांना हुसकावून लावत पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाच्या स्मरणार्थ कारगिल विजय महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी प्रतिमेचे पूजन उपविभागीय अधिकारी रोहिणी न-हे यांच्या हस्ते करण्यात आले.
मंगळवार दिनांक 26 जुलै 2022 रोजी भूम तालुका माजी सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष हेमंत देशमुख, सचिव प्रभाकर हाके याच्या पुढाकाराने तालुक्यातील शेकडो माजी सैनिकांच्या प्रमुख उपस्थितीत भूम येथे कारगिल विजय दिन महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला.
यावेळी भूमच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी न-हे. , पोलीस निरीक्षक दत्तात्रय सुरवसे, माजी सैनिक फेडरेशन जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जावळे, जिल्हा सचिव हरिदास शिंदे यांच्या हस्ते कारगिल विजय महोत्सव प्रतिमेचे दिप प्रज्वलन करून पूजन करण्यात आले.
यावेळी भारत माता की जय, वंदे मातरम, हर हर महादेव अशा प्रकारच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता, यावेळी भूम शहरासह तालुक्यातील शेकडो माजी सैनिक फेडरेशनचे तालुका अध्यक्ष हेमंत देशमुख, सचिव प्रभाकर हाके यांच्या पुढाकाराने शेकडो माजी सैनिक . भावी सैनिक उपस्थित होते,
याशिवाय भारतीय जनता पार्टीचे भूम तालुका अध्यक्ष महादेव वाडेकर, तालुका सरचिटणीस संतोष सुपेकर , भूम शहर अध्यक्ष शंकर खामकर, सरचिरणीस सचिन बारगजे. उपाध्यक्ष बाबासाहेब वीर . उद्योग आघाडी तालुका अध्यक्ष रमेश बगाडे, अल्प संख्याक शहराध्यक्ष प्रदीप साठे. काँग्रेस आय तालुका अध्यक्ष रुपेश शेंडगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आबासाहेब मस्कर, म. न. से तालुका अध्यक्ष विधिज्ञ अरुण मंजुळकर यांचेसह शहरातील नागरिक व्यापारी, सर्व क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .
विशेष करून या कारगिल विजय महोत्सवाच्या कार्यक्रमासाठी माजी सैनिकांच्या पत्नी यांची देखील मोठ्या प्रमाणात आवर्जून उपस्थिती होती.
युद्धा दरम्यान भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन विजय’ अंतर्गत पाकिस्तानी घुसखोरांना हुसकावून लावले होते. लडाखच्या कारगिल जिल्ह्यात आणि नियंत्रण रेषेवरील (एलओसी) इतर ठिकाणी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सशस्त्र संघर्ष झाला होता. जवळपास 60 पेक्षा जास्त दिवस ही लढाई झाली. या संघर्षात टायगर हिलचा विजय ही एक महत्त्वाची कामगिरी होती. शेवटी भारताने आपल्या सर्व प्रदेशांवर नियंत्रण मिळवले .
या लढाईत मोठ्या संख्येने जवानांनी हौतात्म्य पत्करले, तरीही भारत मातेच्या शूर पुत्रांनी तोफांचा आणि छोट्या शस्त्रांनी हल्ला सुरूच ठेवला. या युद्धात आपल्या सैनिकांचे अप्रतिम शौर्य आणि अतुलनीय निर्धार यामुळे शत्रूला भारतीय चौक्यातून मागे हटण्यास भाग पाडले. तेव्हापासून दरवर्षी 26 जुलैला पाकिस्तानच्या घुसखोरीवरील विजयाच्या स्मरणार्थ कारगिल विजय दिवस साजरा केला जातो.
सरकारी आकडेवारीनुसार, भारताच्या बाजूने अधिकृत मृतांची संख्या 527 होती आणि पाकिस्तानी सैन्याची संख्या 357 ते 453 दरम्यान होती. कारगिल युद्धाचा विजय तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी 14 जुलै रोजी घोषित केला होता, परंतु कारगिल विजय दिवसाची अधिकृत घोषणा 26 जुलै रोजी करण्यात आल्याची माहिती माजी सैनिकांनी यावेळी दिली.