
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी सातारा -संभाजी गोसावी
साताऱ्यात खूप चांगली माणसे आहेत पर्यटनासाठी उपायुक्त रचना असल्याने खूप मोठ्या प्रमाणावर येथे पर्यटन पूरक व्यवसायातून रोजगार निर्मिती होऊ शकते काम करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रांत सातारा सारखा दुसरा चांगला जिल्हा नाही अशा शब्दांत सातारा जिल्हा विषयी मावळते जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आपल्या भावना दैनिक चालू वार्ताशी बोलताना व्यक्त केल्या. कोरोनांच्या काळात अतिदक्षता विभाग आणि ऑक्सिजन बेड मोठ्या प्रमाणात उभे करण्यांत मला यश मिळाले.आणि त्यामुळे १० हजार गरीब माणसांना मोफत उपचार देण्यांत मी यशस्वी ठरलो त्यामुळे जिल्ह्यात सगळ्यात मोठी समाधान मला मिळाले असेही मावळते जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आवर्जून सांगितले. प्रशांसनात दोन प्रकारांचे अधिकारी असतात एक खूप बोलतात आणि कमी काम करतात आणि दुसरे कमी बोलताना आणि खूप काम करतात असे जिल्हाधिकारी म्हणजे शेखर सिंह हे या प्रकारांत मोडणारे अधिकारी आहेत. शेखर सिंह यांनी सातारा जिल्ह्यांचा जिल्हाधिकारी पदाचा १० जानेवारी २०२० रोजी तत्कालीन जिल्हाधिकारी श्वेंता सिंघल मॅडम यांच्याकडूंन त्यांनी सातारा जिल्हाधिकारी पदाचा पदभार घेतला होता. तब्बल अडीच वर्षे त्यांनी सातारा जिल्ह्यांतील कामकाज पाहिले त्यापैकी दोन वर्षाचा काळखंड अतिशय खडतर असा आणि कोरोनांच्या साथीचा मुकाबला करण्यांतच गेला. पण शेखर सिंह यांनी सर्व जिल्ह्यातील प्रशांसन यंत्रणायेला हाताशी घेवुन कोरोनाचा मुकाबला केला. शेखर सिंह यांनी सातारा जिल्ह्यांत यापूर्वी सिंधुदुर्ग येथे जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यअधिकारी तर गडचिरोलीचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले होते. याशिवाय त्यांना सातारा जिल्हा सुद्धा अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी आपल्या जिल्हाधिकारी पदाचा कायदा सुव्यवस्था राखत पदभार सांभाळला. सातारचे पत्रकार संभाजी गोसावी आणि मावळते जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचा गडचिरोली जिल्हा पासून चांगलाच परिचय होता. शेखर सिंह यांच्या बहिण श्रीमती.आँचल दलाल मॅडम या सुद्धा सातारा जिल्ह्यांमध्ये सहाय्यक पोलीस अधीक्षक या पदावर त्या कार्यरत आहेत. बहिण भाऊ एका जिल्ह्यांमध्ये आणि सातारकरांच्या सेवेत कार्यरत होते. शुक्रवारी राज्य शासनांने ई-मेल द्वारा शेखर सिंह यांना बदलीचा आदेश जारी केला पण शेखर सिंह यांची बदली मात्र अजूनही गुलदस्त्यातच आहे. शेखर सिंह यांच्या जागेवर सातारचे नूतन जिल्हाधिकारी म्हणून रुचेश जयवंशी यांनी शनिवारी दुपारी मावळते जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडूंन सातारा जिल्ह्यांचा पदभार हाती घेतला. मावळते जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी ऐतिहासिक जिल्ह्यांमध्ये केलेल्या कामाची पोचपावतीच नव्हे तर त्यांना उत्कृंष्ट जिल्हाधिकारी म्हणून त्यांना सातारा ऐतिहासिक जिल्ह्यांमध्ये पुरस्कारही राज्य शासनाकडूंन जाहीर करण्यांत आला होता. त्यामुळे माझ्या कामकाजाविषयी सातारकरांना माझी नक्की आठवण राहील असे आपले मत मावळते जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी व्यक्त केले.सातारा जिल्हा हा पर्यटनासांठी चांगलाच प्रसिद्ध असल्यांमुळे मी माझ्या कुटुंबासह या ठिकाणी नेहमीच येत राहणार असल्यांचेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.