
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- संभाजी गोसावी
सातारा.जिल्ह्यांचे महाराष्ट्र राज्य दशनाम गोसावी समाजांचे जिल्हाध्यक्ष मा.जगन्नाथ गिरी गोसावी उर्फ तात्या यांच्याकडूंन सातारांच्या नूतन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी साहेबांचे भव्य स्वागत केले.यावेळी महाराष्ट्र राज्य दशनाम गोसावी समाजांचे सातारा जिल्हाध्यक्ष जगन्नाथ गिरीगोसावी यांनी सातारा जिल्ह्यांतील संपूर्ण गोसावी बांधवांचे प्रबलित काही प्रश्नं तसेच गोसावी समाजासाठी दफनविधीसाठी अनेक गावांमध्ये जागा नसल्यांमुळे गोसावी समाजाला स्वतांच्या शेतामध्येच दफन विधी करावा लागतो. सातारा जिल्ह्यांतील असे अनेक गावांमध्ये गोसावी समाजासाठी जागेची चांगलीच गैरसोय भासत आहे.साहेब तसेच महाराष्ट्र शासनांला वेळोवेळी प्रस्तांव देत आलो आहोत. शासकीय जागा मिळवून गोरगरीब गोसावी समाजांतील बांधवांना इतर समाजांतील लोकांचा त्रांस थांबवा तसेच गोसावी समाजाला साहेब तुमचे नेहमी प्रधान्य असावे अशी मी अपेक्षा करतो असे म्हणत सातारच्या दशनाम गोसावी समाजांचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ गिरी गोसावी यांनी नुतन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी साहेबांची सदिंच्छा भेट घेत स्वागत केले. यावेळी नूतन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी जिल्हाध्यक्ष गिरीगोसावी यांना माझे गोसावी समाजातील व भटक्या विमुक्त गोसावी समाजातील बांधवांना नेहमीच सहकार्य राहील त्यांची प्रबलित काही कामे मी निश्चिंत मार्गी लावीन आणि गोसावी समाजांला माझे नेहमी प्रधान्य राहील यावेळी महाराष्ट्र राज्य दशनाम गोसावी समाजांचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ गिरी गोसावी यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे आभार मानले.