
दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा-
गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम यांचा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून इशारा
आरमोरी – आरमोरी देसाईगंज तालुक्यातील शेतकऱ्यांना उन्हाळी धान पिक विक्री साठी शासनाने मार्केटींग फेडरेशन च्या वतीने खरेदी विक्री सस्थेच्या केद्रावर उन्हाळी आधारभूत धान खरेदी शेतकऱ्यांसाठी करण्यात आले परंतु जवळपास एक महिन्याच्या वर दिवस लोटुनही अजुन पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात विकलेल्या धान विक्री चे चुकीरे मिळाले नसल्यामुळे पावसाळी रोवनीला सुरवात होऊन मोठ्या प्रमाणात रोवनेही सरले परंतु चुकारे न मिळाल्याने शेतकऱ्यांना धानासाठी लागणारे खत किटकनाशके रोवणी खर्च नांगरणी लागलेला खर्च देण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसेच नसल्यामुळे रोवणी करणारे मंजुर शेतकऱ्यांकडे पैसेसाठी वारंवार तगादा लावला आहे पहिलेच बहुतेक शेतकरी उन्हाळी धानाच्या पैसेने बॅकाचे थकीत पिक कर्ज भरुण नव्याने पावसाळीच्या रोवनीला घेऊ या आशेवर असताना चुकारेच न मिळाल्याने शेतकऱ्यांनी उसने उदार करुण रोवणी केल्याने रोवणी केली की मंजुर लोक पैसेसाठी थाबत नसल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा अडचणीचा सामना करावा लागत असल्यामुळे शासनाने तातडीने मार्केटींग फेडरेशनच्या वतीने सुरू असलेल्या आरमोरी देसाईगंज सह अन्य खरेदी विक्री सस्थेच्या केंद्रावर शेतकऱ्यांनी विक्री केलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ धानाचे चुकारे देण्यात यावे अन्यथा तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून केली आहे.
बहुतेक शेतकऱ्यांना गेल्या वर्षातील पावसाळी धान उत्पादनात घट आल्यामुळे आपल्या उत्पन्नात वाढ निर्माण होऊन कृटुब चांगले चालेल या आशेने नदी नाले जमिनीवर विहीर बोअरवेलवर कृषी कृषी पंप बसवून तर काहींनी तलावाच्या पाण्यानी उन्हाळी धान घेतले यात गडचिरोली आदिवासी विकास महामंडळाच्या आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या देलनवाडी येथील आधारभूत केद्रावर दोनशे एकेचाळीस शेतकऱ्यांनी धानाची विक्री केली याची परंतु जवळपास दिड महिना लोटुनही पावसाळीच्या धान पिकाच्या रोवनीला सुरवात होऊन बहुतेक आधारभूत धान विक्री केलेल्या शेतकऱ्यांचे रोवणे झाले परंतु अजुन पर्यंत विक्रि केलेल्या शेतकऱ्यांचे प्रलंबित असलेमुळे शेतकऱ्यांचे नागरणी खत किटकनाशके रोवणीसाठी चुकारे न मिळाल्याने शेतकऱ्याना आथीक सकटकाचा फटका बसला आहे त्यामुळे शासनाने आरमोरी देसाईगंज तालुक्यातील खरेदी विक्री संस्थेच्या आधारभूत धान खरेदी केंद्रावर विक्री केलेल्या शेतकऱ्यांना चुकारे देण्यात यावे अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून केली आहे.