
दैनिक चालु वार्ता कोरपना तालूका ग्रामीण प्रतिनिधी-प्रदिप मडावी
अंतरगाव (बु), सांगोडा , भोयगाव येथील शेतकर्यांना भेटून जाणुन घेतल्या व्यथा
कोरपना :- लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी तहसील कार्यालय कोरपना येथे आढावा बैठक घेऊन कोरपणा तालुक्यातील अतिवृष्टी, पूरपरिस्थिती आणि त्यामुळे येथे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. यात तालुक्यातील नुकसानग्रस्त शेती, शेतपिके, जनावरे, गाव, घरे, जीवीत हानी आणि अन्य नुकसानीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, तहसीलदार महेंद्र वाकलेकर, गटविकास अधिकारी बेंदूर, तालुका वैद्यकीय अधिकारी स्वप्निल टेंभे, विद्युत अभियंता इंदोरकर, तालुका कृषी अधिकारी दमाले, उपविभागीय बांधकाम विभाग बाजारे, पाणी पुरवठा विभाग अभियंता खोब्रागडे आणि इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या प्रसंगी आमदार सुभाष धोटे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकरी व अन्य नागरिक यांच्या नुकसानीचे सर्वेक्षण करून तातडीने नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या. तसेच या प्रसंगी त्यांनी कोरपना तालुक्यातील अंतरगाव (बु), सांगोडा , भोयगाव येथे भेट देऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. येथील शेतकर्यांना भेटून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. त्यांच्याशी संवाद साधून आवश्यक प्रमाणात नुकसान भरपाई मिळवुन देण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली.
या प्रसंगी कोरपना काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विठ्ठलराव थिपे, माजी जि प सदस्य उत्तमराव पेचे, माजी सभापती श्यामभाऊ रणदिवे, माजी उपसभापती संभाजी कोवे, जेष्ठ नेते सुरेश पा मालेकर, सीताराम कोडापे, सं गां नि योजनेचे अध्यक्ष उमेश राजूरकर, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश लोखंडे, घनश्याम नांदेकर, प्रदीप मालेकर, रोशन आस्वले, मिलिंद ताकसांडे, इस्माईल शेख, निसार शेख, रोशन मरापे, अनिल गोडे, प्रशांत लोढे यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते व स्थानिक नागरिक उपस्थित होते.