
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी पेठवडज -बाजीराव गायकवाड
कागणेवाडी :- कळका ता. कंधार येथून जवळच असलेल्या कागणेवाडी रस्त्यावरील पुल पुराच्या पाण्याने वाहून गेला असून प्रशासनाला वेळोवेळी निवेदन देऊन कळविले असून प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयानी प्रशासनाला वेळोवेळी कळविले आहे. पुल वाहून गेल्यामुळे प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. मोठ्या प्रमाणात अपघात होतात. तेव्हा प्रशासनाने या पुलाची दुरूस्ती करण्यात यावी अशी मागणी परिसरातील असंख्य प्रवाशांनी केली आहे.